गिरणा धरण 17 टक्के भरले

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 21 जुलै 2018

पिलखोड (ता. चाळीसगाव) : 'गिरणा'वरील धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे गिरणाच्या जलसाठा आज(शनिवार) सकाळी 17 टक्के झाला असून धरणात तीन हजार 900 क्यूसेक आवक सुरू आहे. 

'चणकापूर'मधून एक हजार 642 क्यूसेक आणि 'पुनद'मधून एक हजार 985 क्यूसेक असे एकत्रित ठेंगोडा बंधाऱ्यातून तीन हजार 900 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे गिरणा 17 टक्के भरले आहे. धरणात आज(शनिवार) सकाळी तीन हजार 241 दशलक्ष घनफुट जिवंत साठा निर्माण झाला आहे. अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे व शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.

Web Title: Girna dam filled 17 percent