नाशिक - कंधाणे येथे बिबट्याच्या हल्यात शेळी ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यातील आरम खोऱ्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काल मध्यरात्री कंधाणे गावालगत असलेल्या कैलास काळू बिरारी यांच्या शेड मध्ये घुसून रात्री बाराच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक शेळी ठार केली. त्यावेळी बाकी शेळ्यांच्या आवाजामुळे बिरारी यांना जाग आली. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याला आपली शिकार सोडून पळ काढावा लागला. त्यानंतर सकाळी  वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली.

बिबट्याने यापूर्वीही गेल्या महिन्यात त्याच शेडमधून एक शेळी ठार केली होती यांची एक शेळी ठार केली. तर भागडा डोंगर परिसरात एकामहिन्यात चार-पाच शेळ्या ठार केल्या तर दरदिवशी बिबट्ययाचे दर्शन होत असल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण आहे. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील रवींद्र बिरारी, बापू बिरारी, कैलास बिरारी, प्रवीण बिरारी, निंबा बिरारी, सुखदेव ताबे, जीभाऊ बिरारी, साहेबराव बिरारी, भाऊसाहेब बिरारी, पवन तांबे, शुभम बिरारी आदी शेतकरी करत आहेत.

कंधाणे परिसरात वनविभाच्या भोंगळ कारभारामुळे बिबट्याचे हल्ले वाढले असुन पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीत शिरकाव वाढल्याने तात्काळ वनतळ्याची निर्मिती करावी तसेच बागलाण तालुक्यातील जंगलांना लागणाऱ्या आगीची चौकशी व्हावी. हे सर्व प्रकरण संशय निर्माण करणारे आहे, असे मत राष्ट्रवादी युवक काॅग्रेस बागलाणचे अध्यक्ष किरण पाटील यांनी व्यक्त केले. 

Web Title: goat died in leopards attack in kandhane nashik