सुवर्ण बाजाराला पुन्हा झळाळी

Gold
Gold

जळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी होऊन डॉलर वधारल्याने सोन्याच्या दरात तोळ्यामागे गेल्या पंधरा दिवसांत तब्बल ८०० रुपयांची, तर चांदीत किलो मागे पंधराशे रुपयांची वाढ झाली आहे. 

दिवाळीत सोन्याच्या दरात एक हजार ते बाराशे रुपयांची वाढ झाली होती. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये भाव स्थिर होते. मात्र नवीन वर्षाच्या सुरवातीच्या १५ दिवसांत सोन्याच्या भावात तोळ्यामागे तब्बल आठशे रुपयांची वाढ झाली. ३२ हजार २०० तोळे असलेले सोने आज ३३ हजारांवर पोचले आहे. चांदीचे दर किलोमागे पंधराशे रुपयांनी वाढले. पूर्वी ते दर ३९ हजार ५०० होते. आज ४१ हजारांपर्यंत चांदी पोचली आहे. दरात वाढ झाली असली, तरी लग्नसराईमुळे ग्राहकांची सोने, चांदी खरेदीस गर्दी होत असल्याचे चित्र सराफ बाजारात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाचे मूल्य घसरून डॉलर वधारला आहे. यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या लग्नसराईमुळे सोने, चांदीला मागणी कायम आहे. 
- पप्पूशेठ बाफना, संचालक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com