सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

जळगाव - येथील प्रसिद्ध सराफ बाजारात नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या विक्रीत प्रचंड उलाढाल झाली. दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा या सणांच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 1500 ते 1600 रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर घसरल्याने कधी शंभर, दीडशे, कधी पन्नास रुपये असे करीत करीत तब्बल 1600 रुपयांपर्यंत एकूण घसरण झाली आहे. 32 हजार 800 पर्यंत पोचलेल्या सोन्याचा दर (प्रतितोळा) आज 31 हजारांवर आला आहे. 

यंदा दुष्काळाचे सावट असले, तरी बाजारपेठेत सोने खरेदीस नागरिकांचा उत्साह दांडगा होता. धनत्रयोदशीपासून तब्बल वीस दिवस सोन्याच्या बाजारपेठेत झळाळी होती. पाडव्यानंतरही आठ दिवस सोने, चांदी, फॅशनेबल दागिन्यांच्या खरेदीसाठी ओढा अधिक होता. दिवाळीनंतर आता लग्नसराईत लागणाऱ्या दागिन्यांची खरेदी होत आहे. सोन्याच्या दरात गेल्या दहा दिवसांत पंधराशे ते सोळाशे रुपयांची टप्प्याटप्प्याने घसरण झाल्याने ग्राहकांचा सोने खरेदीकडील कल वाढू लागला आहे. त्यासाठी रोज नवनवीन दागिने बाजारपेठेत येत असून, त्यांना ग्राहकांची मागणी आहे. 

या दागिन्यांना मागणी... 
अँटिक कलेक्‍शन, कलकत्ती कलेक्‍शन, कुंदन, टर्किश, पेककार्ट, जलाडू कुंदन कलेक्‍शन, मीना पेंटिंग कलेक्‍शन, रोझगोल कलेक्‍शन, अजंता एरोरा कलेक्‍शन, टेंपल कलेक्‍शन, जेबी स्टोन कलेक्‍शन, रोडिअम स्टेट कलेक्‍शन यासह विविध प्रकारच्या डायमंड कलेक्‍शन यांना ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याचे स्थानिक सराफांनी सांगितले. 

Web Title: Gold prices declined by Rs 1600

टॅग्स