खामखेडा येथे शेतकरी संपांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

खामखेडा (नाशिक) : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला आज 1 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकरी प्रश्नाणांसाठी संपूर्ण भारत बंदची हाक दिली. त्याच पार्श्वभूमीवर खामखेडा आणि परिसरातील शेतकरी बांधवाच्यावतीने राज्य महामार्ग 17 वरील कळवण सटाणा रस्त्यावरील चौफुली येथे रस्ता रोको करून शेतमाल रस्त्यावर फेकून आंदोलन  छेडण्यात आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी, 7/12 कोरा करावा, वीजबिल माफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी देशासह राज्यातील बळीराजा आजपासून पुन्हा संपावर गेला  आहे. आजपासून 10 दिवस शेतकरी संपावर जाणार असून या कालावधीत दुधासह अन्य शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणला जाणार नाही.

शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण होत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा आजपासून राज्यासह देशभरात शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील बळीराजा आजपासून संपावर  गेला असून सकाळपासून शेतमाल कुठल्याही बाजार समितीत घेऊन जाणार नाही आणि  जाऊ दिला जाणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनि घेतला आहे.

शेतकरी संपासाठी आज  संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक शेतकऱ्यांनी दिल्याने  खामखेड़ा गावाने सकाळ पासून आपला पूर्णता सहभाग नोंदवून  गावातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी 1 जून ते 10 जून पर्यंत  भाजीपाला विक्रीसाठी कोणत्याही बाजार समितीत घेऊन जाणार नाही.

यावेळी अण्णा पाटील, दादाजी बोरसे यानी सरकारच्या या अनागोंदी कारभारा बद्दल व् शेतकऱ्यांचे मागण्या पूर्ण करण्या बद्दल रस्ता रोको प्रसंगी आपल्या भाषणात  कळकळीच्या भावना उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त केल्या.

सकाळी दहा वाजता  शेतकऱ्यांनी  राज्य महामार्गावर  खामखेड़ा चौफुलीवर जमाव करून घोषणाबाजी करत भाजप सरकारबद्दल तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.  यावरून असे दिसून आले  सरकारच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाडीत ओढला जात आहे.

यावेळी संतोष मोरे, संजय मोरे, रवींद्र शेवाळे, सुनील शेवाळे, बापू शेवाळे, नितिन शेवाळे, बाळू शेवाळे, विश्वास शेवाळे, अरुण शेवाळे, दादाजी शेवाळे, संजय शेवाळे, सुरेश शेवाळे, नरेंद्र सोनवणे, कैलास शेवाळे, प्रवीण आहेर, वसंत शेवाळे, निवृत्ती बिरारी, वकील शेवाळे, काकाजी शेवाळे, मुन्ना मोरे, सोनू शेवाळे, मार्कंड जाधव, रोशन शेवाळे आदींसह हजारो शेतकरी उपस्थित होते.

Web Title: good response to farmers ban in khamkheda nashik