Nandurbar News : विनापरवाना शेतमाल खरेदी केंद्रांचे ‘पीक’; परवानाधारक व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे नुकसान

crop loan
crop loansakal

Nandurbar News : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादित माल विनापरवाना खासगी व्यक्तींकडून खरेदी केला जातो. त्यामुळे बहुतांश ठिकाणी अशिक्षित शेतकरी नाडला जात आहे.

शिवाय भुरट्या चोरांनी शेतातून चोरी केलेला शेतमाल या ठिकाणी सहज विक्री करता येत असल्याने चोरांचेही फावते यासाठी ग्रामीण भागातील विनापरवाना शेतमाल खरेदी केंद्रे तत्काळ बंद करण्यात यावीत, अशी मागणी सुजाण शेतकरी वर्गाकडून होत आहे.

तालुक्यात सध्या खरीप पिकांच्या काढणीस सुरवात झाली आहे. त्यात कापूस, सोयाबीन, मूग आदींसह विविध खरीप पिकांचा समावेश आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अल्प पावसामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. (goods produced by farmers are purchased from private individuals without license nandurbar news)

नेमका याच संधीचा फायदा घेत ग्रामीण भागातील किरकोळ खरेदीदार या शेतकऱ्यांना गळ घालून मालाची खरेदी करताना दिसतात. तालुक्यात खेड, खेडदिगर, म्हसावद, वडाळी, तोरखेडा, सारंगखेडा, प्रकाशा आदींसह विविध गावांमध्ये खासगी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. शेतकऱ्याचा माल कमी किमतीत घेऊन तो बाहेर जास्त किमतीत विकला जातो, शिवाय वजनकाटे प्रमाणित आहेत की नाही हेही शेतकऱ्यांना माहीत नसते. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांची लूट होते. या गोष्टींचा पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

शेतकऱ्यांनीही सजग व्हावे

दरम्यान, शेतमाल विक्रीची कायदेशीर व्यवस्था उभी राहावी व कष्टाने पिकविलेल्या शेतमालाची किंमत शेतकऱ्याला मिळावी यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ नुसार राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना केली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनीही सजग होऊन आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीत विकला पाहिजे, जेणेकरून मालाला भावही मिळेल शिवाय साऱ्याच गोष्टी प्रमाणित असल्याने खरेदी-विक्री व्यवहार पारदर्शक होऊन शेतकऱ्यांची फसवणूक टळेल.

परवानाधारक व्यापाऱ्यांचे नुकसान

दरम्यान, सुमारे वर्षभराचा हिशेब केल्यास तालुकाभरात कापूस, तसेच भुसार शेतमालाचा अंदाजित कोट्यवधींच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार विनापरवाना होत असतो.

crop loan
Dhule Agriculture News : कपाशीवर मिलीबग, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त

त्यामुळे परवानाधारक व्यापाऱ्यांचे मात्र यात नुकसान होते.

शिवाय वजनाच्या मापात पापाच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. परिणामी कायदेशीर बाबीही यामुळे निर्माण होतात. परवानाधारक व्यापारी शासनाच्या कर भरतात, मात्र विनापरवाना व्यापाऱ्यांकडून खरेदी-विक्रीवेळी कोणत्याही प्रकारचा कर शासनास मिळत नसल्याने अप्रत्यक्षपणे यातून शासनाचेही नुकसान होत आहे.

"अनेक वेळा गावाशेजारीच किरकोळ खरेदीदार व्यापाऱ्यांना माल देतेवेळी दराबाबत वाद उद्‍भवतात. त्याचबरोबर अनेक वेळा वजनकाट्यात झुकते माप व्यापारी त्यांच्याकडे ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होतो. पैसे रोखीने मिळत असले तरी शेतकरी मात्र दराबाबतही नाडला जातो. याबाबत शेतकरीहितासाठी बंधने आणली पाहिजेत." -जेल्या पावरा, शेतकरी

"ग्रामीण भागात खासगी व्यापारी विनापरवाना शेतमालाची खरेदी करतात व त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होते. ही बाब निदर्शनास आल्यास निश्चितच तपास करून अभ्यासांती शेतकरीहितासाठी कठोर पावले उचलली जातील." -अभिजित पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा

crop loan
Nanadurbar Agriculture News : शेतकरी धास्तावला; पपईवर डाऊनी, मोझॅकचा प्रादुर्भाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com