Nandurbar News : मोहिमेसाठी योजना, लाभार्थ्यांची माहिती सादर करा ; जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

Nandurbar: Collector Manisha Khatri speaking in the meeting held on Thursday in the collector's office. Neighboring Zilla Parishad Chief Executive Officer Raghunath Gawde, Additional Collector Dhananjay Nikam, Resident Deputy Collector Sudhir Khande, Forest Conservator Krishna Bhawar, Laxman Patil, Assistant Collector and Project Officer Meenal Karanwal etc. Officials present in the second photo
Nandurbar: Collector Manisha Khatri speaking in the meeting held on Thursday in the collector's office. Neighboring Zilla Parishad Chief Executive Officer Raghunath Gawde, Additional Collector Dhananjay Nikam, Resident Deputy Collector Sudhir Khande, Forest Conservator Krishna Bhawar, Laxman Patil, Assistant Collector and Project Officer Meenal Karanwal etc. Officials present in the second photoesakal
Updated on

Nandurbar News : ‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी योजना व लाभार्थ्यांची माहिती त्वरित सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी गुरुवारी (ता. १९) दिले.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम जिल्ह्यात राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा सभागृहात बैठक झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

बैठकीस जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसरंक्षक कृष्णा भवर, लक्ष्मण पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Government at your door Scheme Instructions of Collector Manisha Khatri Give campaign details of beneficiaries Jalgaon News)

Nandurbar: Collector Manisha Khatri speaking in the meeting held on Thursday in the collector's office. Neighboring Zilla Parishad Chief Executive Officer Raghunath Gawde, Additional Collector Dhananjay Nikam, Resident Deputy Collector Sudhir Khande, Forest Conservator Krishna Bhawar, Laxman Patil, Assistant Collector and Project Officer Meenal Karanwal etc. Officials present in the second photo
Nashik News: ग्रामीण रस्ते विकासाच्या निधीत 54 कोटींची कपात; ZPला निधी देतांना जिल्हा नियोजनचा आखडता हात

या वेळी श्रीमती खत्री म्हणाल्या, की सर्व विभागांच्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार असल्याने सर्व विभागांनी आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची यादी तयार करावी.

या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची माहिती सर्वसमान्य नागरिकांपर्यंत पोचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, पात्र लाभार्थ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह अचूक माहिती गुगलशीटवर त्वरित सादर करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nandurbar: Collector Manisha Khatri speaking in the meeting held on Thursday in the collector's office. Neighboring Zilla Parishad Chief Executive Officer Raghunath Gawde, Additional Collector Dhananjay Nikam, Resident Deputy Collector Sudhir Khande, Forest Conservator Krishna Bhawar, Laxman Patil, Assistant Collector and Project Officer Meenal Karanwal etc. Officials present in the second photo
Pune News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून दगडूशेठ गणपती बाबत मोठा निर्णय

प्रत्येक विभागाने दररोज केलेल्या कामाचा अहवाल गुगलशीटवर उपलब्ध करून द्यावा. माहिती भरण्यासाठी आपल्या विभागातील जबाबदार कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत तालुकास्तरावर कार्यक्रम राबविताना मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसिद्धी करावी.

तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात लाभ देताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. सर्व तहसीलदारांनी जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेयर, सातबारा, उत्पन्नाचे दाखले, रेशनकार्ड वाटप करण्यासाठी नियोजन करावे. प्रत्येक तालुकास्तरावर हा कार्यक्रम होणार असल्याने यासाठी सर्व विभागांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

Nandurbar: Collector Manisha Khatri speaking in the meeting held on Thursday in the collector's office. Neighboring Zilla Parishad Chief Executive Officer Raghunath Gawde, Additional Collector Dhananjay Nikam, Resident Deputy Collector Sudhir Khande, Forest Conservator Krishna Bhawar, Laxman Patil, Assistant Collector and Project Officer Meenal Karanwal etc. Officials present in the second photo
Crime News: धक्कादायक! जन्मदात्याने आपल्या १८ दिवसांच्या बाळाला तीन लाखांत विकलं, कारण...

जत्रा शासकीय योजनांची

जत्रा शासकीय योजनांची उपक्रमाचे जिल्हा व तालुकास्तरावर १५ जूनपूर्वी आयोजन करून नागरिकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाच्या असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टीने परिपूर्ण नियोजन करून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन श्रीमती खत्री यांनी केले. या वेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.

Nandurbar: Collector Manisha Khatri speaking in the meeting held on Thursday in the collector's office. Neighboring Zilla Parishad Chief Executive Officer Raghunath Gawde, Additional Collector Dhananjay Nikam, Resident Deputy Collector Sudhir Khande, Forest Conservator Krishna Bhawar, Laxman Patil, Assistant Collector and Project Officer Meenal Karanwal etc. Officials present in the second photo
Nashik News: ग्रामीण रस्ते विकासाच्या निधीत 54 कोटींची कपात; ZPला निधी देतांना जिल्हा नियोजनचा आखडता हात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com