Crime News: धक्कादायक! जन्मदात्याने आपल्या १८ दिवसांच्या बाळाला तीन लाखांत विकलं, कारण...

बाळ दत्तक दिल्याचा खोटा बॉण्ड बनवून 3 लाखात मूल विकल्याचे आले समोर
Crime News
Crime Newsesakal

सोलापूर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या पोटच्या मुलांसाठी आई वडील दिवस रात्र एक करतात. तर अनेक जण आपल्याला मुल व्हावे यासाठी देवावर श्रद्धा ठेवून नवस करतात, वैद्यकीय उपचार करतात. अशातच काही घटना समोर येतात त्यामुळे काही आई वडील दगडाच्या काळजाचे असतील का असा विचार मनात येतो. अशीच एक घटना सोलापूर शहरातून समोर आली आहे. (Latest Marathi News)

फक्त १८ दिवसांच्या बाळाची विक्री त्याच्या जन्मदात्या आई-बापानेच केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एक नवजात बाळ दत्तक घेतल्याचा खोटा बाँड तयार करून त्या बाळाची तीन लाख रुपयास विक्री करणाऱ्या त्या बाळाच्या आई-वडिलांसह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे सोलापुरात बाळांची विक्री करणाऱ्यांचा वावर असल्याचा संशय वाढला आहे.(Latest Marathi News)

Crime News
Monsoon Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अंदमानात 3 दिवस आधीच मान्सून धडकला

अगोदर तीन मुले त्यानंतर हा चौथा मुलगा झाल्यानंतर आई वडिलांनी ही मूल दत्तक देत असल्याच्या नावाखाली खोटा बाँड तयार करून विकले. 18 दिवसांच्या नवजात बाळाच्या विक्रीचा प्रकार उघड झाल्यानंतर शहर परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.(Latest Marathi News)

बाळाच्या जन्मदात्या आई-वडिलांनी आपल्या बाळाची विक्री केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेने ८० हजार रुपये घेतल्याचे उघड झाले होते. दरम्यान या प्रकरणी एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींवर अल्पवयीन न्याय कायद्याअंतर्गत सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Gautami Patil : गौतमी पाटीलचा कार्यक्रम पडणार महागात, आयोजकांच्या खिशाला लागणार चौपट कात्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com