धुळे- जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशनकार्डवर धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी, तसेच केशरी, शुभ्र रेशनकार्डधारक लाभार्थ्यांची पात्रता, वय, सदस्य संख्या आदी बाबींच्या पडताळणीसाठी ३१ मेपर्यंत शोधमोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली.