दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालतेय : अंनिस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नाशिक : दाभोळकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना भाजप सरकार पाठीशी घातल असल्याचा थेट आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि आजतागायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया याप्रकरणी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे तपासयंत्रणाही शासनाच्याच इशाऱ्यावर काम करीत असल्याने दाभोळकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईल का, अशी शंकाच पाटील यांनी व्यक्‍त केली. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सभासद नोंदणी संदर्भातील बैठकीसाठी अविनाश पाटील हे नाशिकमध्ये आले असता, त्यांनी सदरचा आरोप केला आहे. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्त्येत सहभागी असलेल्या संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यापार्श्‍वभूमीवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. पाटील म्हणाले, दाभोळकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी याबाबत राजकीय इच्छाशक्तीच नाही. एवढचे नव्हे तर शासनच संशयितांना पाठीशी घालते आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयात जामीन मंजूर होत आहे.

तपासी यंत्रणा शासनाच्या हातातील बाहुले आहे. न्यायालयाने तपासी यंत्रणेच्या संथपणा आणि एकूणच तपासावर वारंवार ताशेरे ओढलेले असताना शासनाकडून त्याबाबत काहीही गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे आता आमचाही तपासी यंत्रणेवरून विश्वास उडू लागला आहे, असेही पाटील म्हणाले.

Web Title: Government Supports the Killers of Dabholkar says Avinash Patil