कागदी घोडा लागला धावायला!

विनोद बेदरकर
शनिवार, 8 एप्रिल 2017

नाशिक विभागात दफ्तर दिरंगाईबाबत आर्थिक वर्ष दिलासादायक

नाशिक विभागात दफ्तर दिरंगाईबाबत आर्थिक वर्ष दिलासादायक
नाशिक - सरकारी कार्यालयात चकरा मारून अनेकांची अर्ध्याहून अधिक आयुष्य खर्ची पडते. त्यामुळेच "सरकारी काम आणि सहा महिने थांब' या पारंपरिक उक्तीचा याच लाल फितीच्या कामातून जन्म झाला असावा. आर्थिक वर्षात उत्तर महाराष्ट्रात मात्र, हे चित्र बदलले. तब्बल 3 लाखांहून अधिक अर्ज याच आर्थिक वर्षात निकाली निघाले. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात "कागदी घोडा धावायला लागला' असाच सामान्यांचा अनुभव राहिला.

सरकारी कार्यालयात सामान्यांना कायम चकरा माराव्या लागतात. अनेक कार्यालयांमध्ये दफ्तर दिरंगाईमुळे मनस्तापही अनुभवास येतो. मावळते आर्थिक वर्ष मात्र, सामान्यांना काहीसा दिलासे देणारे ठरले. तब्बल 3 लाखांहून अधिक नागरिकांच्या अर्जाचा वर्षभरात निपटारा झाला. पाचही जिल्ह्यांत मिळून सरकारी दफ्तरी प्रमुख 7 सेवा मिळविण्यासाठी आलेल्या अर्जांपैकी 3 लाख 2 हजारांवर नागरिकांच्या अर्जाचा निपटारा झाला. वर्षभरातील 6 हजार 420 अर्ज
प्रलंबित आहेत. त्यात, एकट्या नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबित अर्जांची संख्या 4478 इतकी आहे.

सात सेवांसाठी अर्ज
जिल्हा एकूण प्राप्त अर्ज निर्णय झालेले अर्ज निर्णयाविना प्रलंबित अर्ज

नाशिक 60055 59634 421
नगर 93249 92479 770
जळगाव 101387 100636 751
धुळे 21268 21268 0
नंदुरबार 33226 28748 4478
एकूण 309185 302765 6420

Web Title: government work fast