शेतकऱ्यांना उपचारासाठी सरकार पाच लाखाची मदत देणार - दानवे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

येवला : सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज सुरु आहे. ब्रिटिशांच्या काळातील आणेवारी बंद करून मोदी सरकारने तीस टक्क्यावर नुकसान झाले तरी दुष्काळाची नुकसान भरपाई देण्याचे धोरण केले आहे. हमीभावातील फरक देन्यासह शेतकर्यांला कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी वार्षिक पाच लाख रुपयांची मदतीची आयुष्यमान योजना सुरु होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.

येवला : सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज सुरु आहे. ब्रिटिशांच्या काळातील आणेवारी बंद करून मोदी सरकारने तीस टक्क्यावर नुकसान झाले तरी दुष्काळाची नुकसान भरपाई देण्याचे धोरण केले आहे. हमीभावातील फरक देन्यासह शेतकर्यांला कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी वार्षिक पाच लाख रुपयांची मदतीची आयुष्यमान योजना सुरु होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.

तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजरपाडा, पालखेड कालवा आदी पाणी प्रश्नाबाबत प्रांतिक सदस्य बाबा डमाळे यांच्या आग्रहाखातर ग्रामस्थांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शेलार होते. तर तात्यासाहेब लहरे, नगरसेवक प्रमोद सस्कर, जयाजी शिंदे, रंगनाथ भोरकडे, माणिकराव रसाळ आदीची प्रमुख उपस्थिती होती.

जुने धरणे व पाट पाण्याच्या अपूर्ण कामांना प्राधान्य देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला नाबार्डचे 17 हजार कोटीचे कर्ज दिले आहे.निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणी जेलमध्ये बसून कामाचे श्रेय असतील तर जेल मधून बाहेर कशासाठी आलात? असा सवाल दानवे यांनी केला.

महाराष्ट्रातील अनेक धरणे अपूर्ण असून अपूर्ण धरणाच्या, बंधार्‍यांच्या, पाटपाण्याचा पाणीप्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे ठरले आहे. त्यामुळे राज्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढणार असून मांजरपाडा व पालखेड पाणी समस्यांवर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना अपूर्ण कामांच्या बाबत डमाळे यांना बरोबर घेऊन एक बैठक मंत्रालयात घेऊ असे ते म्हणाले.केंद्र सरकारने शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत निर्णय झाला असून शेतकर्यांनी आपला माल बाजार समितीकडे कमी भावाने विकला तरी त्यांना नंतर भाव अंतर्गत फरक मिळणार असल्याचे दानवे म्हणाले. 

डमाळे यांनी मांजरपाडा, पालखेड कालवा व तालुक्यातील इतर पाणी प्रश्‍नावर अनेक वर्षांपासून पुढार्‍यांनी झुलत ठेऊन जनतेला वेड्यात काढल्याचे परखड मत व्यक्त केले. सूत्रसंचालन हरिभाऊ भागवत यांनी केले.आभार रामुदादा भागवत यांनी मानले. माणिकराव दौंडे, संदीप मुरकुटे, नारायण भोरकडे, बाळासाहेब काळे, अरुण देवरे, आप्पासाहेब भागवत, दिलीप भागवत, संजय भागवत, अमोल सोनवणे, महेंद्र जाधव, शिवाजी शेळके, नाना शेळके, संतोष केंद्रे, मुसा शेख मौलाना, भरत बोंबले, डॉ. भगवान सोनवणे, रामदास भागवत, सचिन देशमुख, गणेश चव्हाण, वसंतराव वाघ, केशव खोकले आदि शेतकरी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: governments help 5 lakhs to farmers treatment said raosaheb danawe