Graduate Constituency Election : मतपत्रिकेसोबत जांभळा स्केचपेन वापरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Collector Jalaj Sharma

Graduate Constituency Election : मतपत्रिकेसोबत जांभळा स्केचपेन वापरा

धुळे : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे. त्या वेळी मतदारांनी मतदानासाठी मतपत्रिकेसोबत दिलेला जांभळ्या रंगाचाच स्केच पेन वापरावा. याशिवाय इतर पेन, बॉलपेन किंवा पेन्सिल वापरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, की पसंतीक्रम या कॉलमखालील जागेत आपण ज्या उमेदवारास प्रथम पसंती दिली आहे, त्याच्या नावासमोर क्रमांक १ लिहून मतदान करावे. जेवढे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, त्यांच्या संख्येइतके पसंतीक्रम नोंदवू शकतात. (Graduate Constituency Election Use Purple Sketch Pen with Ballot Paper Collector Jalaj Sharma appeal Dhule News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

क्रमांक १ पसंतीक्रम दर्शविल्यास उर्वरीरित उमेदवारांच्या नावापुढे २, ३, ४…इत्यादी असा पसंतीक्रम नोंदविता येईल. एका उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच संख्या लिहावी. एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावापुढे एकच संख्या लिहू नये. पसंतीक्रम केवळ अंकात म्हणजे १, २, ३….इ. लिहावा. शब्दात म्हणजे एक, दोन, तीन असे लिहू नये.

अंक लिहिताना भारतीय संख्यांचे आंतरराष्ट्रीय स्वरूप जसे १, २, ३…इ. किंवा रोमन लिपी I, II, III इत्यादी अथवा राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषेत लिहावे. मतपत्रिकेवर कोठेही सही करू नये किंवा नाव, अक्षरे लिहू नयेत. अंगठ्याचा ठसादेखील उमटवू नये. मतपत्रिकेवर कुठेही ‘’ किंवा ‘X’ अशी खूण पसंतीक्रमासाठी करू नये, अन्यथा मतपत्रिका बाद होईल. मतपत्रिका वैध होण्यासाठी मतदाराने मतपत्रिकेवरील कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे १ हा पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहेत, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा यांनी कळविले आहे.

हेही वाचा: Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन