पाच जणांच्या माघारीनंतर 17 उमेदवार रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नाशिक - नाशिक पदवीधर मतदारसंघात आज पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे 17 उमेदवार रिंगणात आहेत. नाशिक रोडला महसूल कार्यालयात विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय आधिकारी एकनाथ डवले यांच्या कार्यालयात आज दुपारी तीनपर्यंत मनोज पवार, सुभाष डांगे, सुरेश टाके, विठ्ठल गुंजाळ, पुरुषोत्तम रकिबे या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 24 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यांपैकी दोन उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले होते. पात्र ठरलेल्या 22 उमेदवारांपैकी पाच जणांनी अर्ज मागे घेतले. आज उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. 

353 केंद्रांवर मतदान 
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, प्रशासकीय स्तरावर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांतील 353 केंद्रांवर मतदान होईल. निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून दुग्धविकास सचिव आर. जे. कुलकर्णी यांची नियुक्ती केली. पाचही जिल्ह्यांत मतदान केंद्रांची सोय आहे. नंदुरबार जिल्ह्यात 16 केंद्रे असतील. धुळे- 33, जळगाव- 41, नगर- 127, तर नाशिकला 136 केंद्रांवर मतदान होईल.

Web Title: graduate election nashik