निवडणूकीत पराभूत झाला, पण निराश नाही झाला; दुसऱ्या दिवशी न सुटणारा प्रश्न त्याने दोन तासांत सोडविला  

जगन्नाथ पाटील   
Thursday, 21 January 2021

दोन वर्षांपासून सांडपाण्याचे डबके साचत होते. पायी येण्या-जाण्यासह वाहतुकीचीही मोठी अडचण निर्माण झाली होती.

कापडणे : समाजकारणाला राजकारणाची जोड देणाऱ्यांची समाजात कमी नाही. समाजकार्य करतानाच राजकारणात नशीब आजमावताना पराभूत झाल्यानंतर समाजकार्याचा त्याग करून राजकारणातच नशीब आजमाविणाऱ्यांचीही वाणवा नाही. पण येथील युवा सामाजिक कार्यकर्ता प्रफुल्ल पाटील ऊर्फ गोलूबाबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांनी दुसऱ्या दिवसापासूनच सामाजिक कामात गुंतवून घेत, दोन वर्षांपासून न सुटलेला प्रश्न अवघ्या दोन तासांत सोडविला.

आवश्य वाचा- कसं होणार जळगावच ! उड्डाणपुल अर्धा बांधला गेला, तरी पूल ‘वाय’किंवा ‘टी’आकाराचा हवा हे ठरेणा   
 

कापडणे येथील प्रभाग चारमधील जयवंत पाटील यांच्या घराजवळ व प्रभाग पाचमधील योगेश पाटील यांच्या घराजवळ दोन वर्षांपासून सांडपाण्याचे डबके साचत होते. पायी येण्या-जाण्यासह वाहतुकीचीही मोठी अडचण निर्माण झाली होती. दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीकडे तगादा लावूनही प्रश्न सुटत नव्हता.

नागरिकांना दिले होते आश्वासन

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतांना प्रफुल्ल पाटील यांना तेथील रहिवाशांनी ही समस्या लक्षात आणून दिली होती. निवडणुकीनंतर समस्या जातीने सोडविण्याचे आश्वासन दिले. पण पाटील पराभूत झाले.

वाचा- शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; चिमठाणे परिसरातील शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्याने लावला कोटीचा 'चुना '
 

पराभव तरी समस्या त्याने सोडवली

निवडणूकीत पराभव झाल्यानंतरही प्रफुल्ल पाटील निराश झाले नाही. पराभव उगाळत न बसता त्यांनी मित्र व यंत्रसामग्री घेऊन लोकांना दिलेले आश्वासन दुसऱ्याच पुर्ण करण्याचे ठरविले. दोन वर्षापासून प्रलंबीत प्रश्न दोन तासांत त्यांनी पाण्याचा निचरा केला. या वेळी भूषण पाटील, येतीस पाटील, निखिल पाटील, देवेंद्र पाटील, गोपाल पाटील, अशोक पाटील, दादू पाटील, किरण पाटील, अमोल पाटील, तुषार पाटील व विवेक पाटील आदींनी श्रमदान केले. 

 
मी पुन्हा नव्या उभारीने सामाजिक कार्यास सुरवात केली आहे. हार-जीत तर होतच असते. काही हरकत नाही. समाजसेवा सुरूच ठेवेल. 
- प्रफुल्ल पाटील, युवा सामाजिक कार्यकर्ता 

 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election marathi news kapadne election defeated pending issue next day solved