esakal | बापरे! घरातून एक सदस्य एकदा तरी सरपंच व्हावा म्हणून लावली ४२ लाखांची बोली; गावाची सर्वत्र चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

gram-panchaya

यंदा गावातील खोंडामळी मंदीर उभारणीसाठी जो सर्वात जास्त देणगी देईल त्याची वर्णी संरपंच पदासाठी लागेल असे ठरविण्यात आले.

बापरे! घरातून एक सदस्य एकदा तरी सरपंच व्हावा म्हणून लावली ४२ लाखांची बोली; गावाची सर्वत्र चर्चा

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

नंदूरबार ः  राज्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतच्या निवडणूकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे दररोज काहीना काही राजकीय घडामोडी घडत आहे. असेच काही नंदूरबार जिल्ह्यातील एका आदिवासी गावात संरपंच पदासाठी ४२ लाखाची बोली लागल्याने राज्यात या गावाची एकच चर्चा सद्या सुरू आहे. 

आवश्य वाचा- धुळे महापालिकेला स्कॉच ॲवॉर्ड; भुयारी गटार स्वच्छतेसाठी रोबोटिक मशिनचा वापर -

नंदूरबार जिल्ह्यातील खोंडामळी हे पाच हजार नागरी वस्तीचे गाव असून गावातील वाघेश्वरी देवीवर गावकऱ्यांची मोठी श्रध्दा आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत यंदा गावातील खोंडामळी मंदीर उभारणीसाठी जो सर्वात जास्त देणगी देईल त्याची वर्णी संरपंच पदासाठी लागेल असे ठरविण्यात आले. ठरल्यानुसार लिलावाची बोली लागली आणि राज्यात एकच चर्चा सुरू झाली. 

लिलावात ४२ लाखाची बोली...
सरंपच पदासाठी मंदिराला देणगी देण्यासाठी बोली सुरू झाल्यावर काहींनी साधारण २५ लाख ते ३८ लाखापर्यंत बोली काहींनी लावली. पण सर्वात जास्त प्रदीप वना पाटील यांनी ४२ लाखाची बोली लावणी आणि ही बोली अंतिम ठरली. 

आवश्य वाचा- कोऱ्या करकरीत नोटांनी फेडत होता उधारी; पोलिस धडकले आणि सत्य समोर आले

घरातून एकदा तरी सरपंच व्हावा...
प्रदीप वना पाटील यांच्या घरातील एक सदस्य तरी संरपंच व्हावा असा मानस होता. त्यानुसार देविवरील श्रध्दा आणि मनात असलेल्या मानस नुसार सरपंच पदासाठी प्रदीप पाटील यांनी लिलावात ४२ लाखाची बोली लावून पाच वर्षासाठी ग्रापमपंचायतीचा सरपंच होण्याचा मानस पूर्ण केला. त्याना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी प्रोत्साहीत केल्याची माहिती समोर येत आहे. 

पण प्रदीप पाटील पात्र नाही
प्रदीप पाटील यांनी सरपंच पदासाठी ते पात्र नसून त्यांना चार अपत्य आहे. ते व त्यांच्या पत्नीसा सरंपच होता येणार नाही. पाटील यांनी मंदिर उभारणीसाठी सर्वात जास्त बोली लावलेली असल्याने त्यांच्या घरातील एक व्यक्ती सदस्य होता येईल तसेच ते सांगतिल तेच सदस्य ग्रामपंचातमध्ये बिनवीरोध निवड त्यांची होणार आहे. त्यामुळे प्रदीप पाटील यांच्या मुलीची सरपंच पदी वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सद्या गावात सुरू आहे. 

आवर्जून वाचा- खेळता खेळता अचानक बालक गायब झाला; आणि समोर आली भयंकर घटना    

सरपंच पदाची बोलीची सर्वत्र चर्चा
राज्यात सरपंच पदासाठी बोली लावाणे आणि ४२ लाखाची एवढी मोठी बोली एका पदासाठी लागणे अशी घटना पहिलीच असल्याचे सांगितली जात आहे. त्यामुळे राज्यभर या सरपंच पदाच्या बोलीची एकच चर्चा आहे.  


राजकीय घडामोडीची शक्यता 
बोली लावून सरपंचपद दिले जात असल्यावर गावातील काही नागरिकांनी यावर आक्षेप नोंदवीला आहे. गावाच्या विकासासाठी व एकोपा रहावा यासाठी लवकरच हा विरोध मावळेल असे वाटत असला तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत घडामोडी होण्याची शक्यता आहे.

loading image