Gram Panchayat Election : 402 उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा मंगळवारी फैसला!

Devendra Patil, Vice President of Zilla Parishad showing the sign of voting in Gram Panchayat Elections.
Devendra Patil, Vice President of Zilla Parishad showing the sign of voting in Gram Panchayat Elections.esaka

शिरपूर (जि. धुळे) : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या ४०२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य रविवारी (ता. १८) मतदान यंत्रात बंद झाले. किरकोळ बाचाबाची वगळता तालुक्यातील ७४ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. मंगळवारी (ता. २०) येथील तहसील कार्यालयात मतमोजणी केली जाणार आहे. (Gram Panchayat Election political future of 402 candidates will decided on Tuesday dhule news)

तालुक्यातील खंबाळे, वाघाडी, करवंद, वरझडी, मांजरोद, अर्थे खुर्द, अर्थे बुद्रुक, अजंदे बुद्रुक, हाडाखेड, बोराडी, थाळनेर, अजनाड, महादेव दोंदवाडे, तऱ्हाडकसबे, खर्दे पाथर्डे, तोंदे व हिसाळे या १७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. माघारीच्या मुदतीअंती बोराडी ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाली.

त्यामुळे उर्वरित १६ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या १६ जागांसाठी ५९ उमेदवार, तर सदस्यपदाच्या १४१ जागांसाठी ३४३ उमेदवार असे एकूण ४०२ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील ७४ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरवात झाली.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Devendra Patil, Vice President of Zilla Parishad showing the sign of voting in Gram Panchayat Elections.
Nitin Gadkari : नागपूरप्रमाणे होणार नाशिकमध्ये डबलडेकर उड्डाणपूल - नितीन गडकरी

उमेदवारांनी संपूर्ण ताकद एकवटल्याने सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारी साडेतीनपर्यंत ६३.४९ टक्के मतदान नोंदविण्यात आले. सायंकाळी साडेपाचपूर्वी उमेदवारांनी आवाहन करून मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याचे प्रयत्न चालविले होते. रात्री उशिरापर्यंत अंतिम टक्केवारी नोंदविण्याचे काम सुरू होते.

मंगळवारी मतमोजणी

येथील तहसील कार्यालयात मंगळवारी सकाळी दहापासून मतमोजणीला सुरवात होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण नऊ टेबले असून, त्यातील सात टेबलांवर प्रत्येकी दोन, तर दोन टेबलांवर प्रत्येकी एक अशा एकूण १६ ग्रामपंचायतींची मतमोजणी केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी १६ मतमोजणी अधिकारी व २७ सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Devendra Patil, Vice President of Zilla Parishad showing the sign of voting in Gram Panchayat Elections.
Gram Panchayat Election : दाभाडीत 67 टक्के मतदान; सरपंचपदाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com