Gram Panchayat Election : नंदुरबारमध्ये चुरशीची लढत; राजकीय दावे- प्रतिदावे अन् सत्तेचे वर्चस्व

Gram Panchayat Election 2022
Gram Panchayat Election 2022esakal

GRAM PANCHAYAT ELECTION 2022 : नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीची लढत दिसुन येत होती. अनेक राजकीय गटात दावे - प्रतिदावे होताना दिसुन आले. त्याचप्रमाणे कुठे भाजप तर कुठे काँग्रेस तर कुठे महा विकास आघाडी चे वर्चस्व प्रस्थापित होताना दिसुन आले. सता संघर्ष मोठया प्रमाणावर दिसुन आला.

शिंदे गट शिवसेनेचा ३८ ग्रामपंचायतींवर झेंडा

जिल्ह्यातील १२३ पैकी ७० ग्रामपंचायतींवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार रिंगणात होते. त्यांपैकी नंदुरबार तालुक्यातील १०, धडगाव २४, अक्कलकुवा १ व विसरवाडी १ अशा ३६ ग्रामपंचायतींवर शिंदे गट शिवसेनेचा झेंडा फडकला आहे, तर नंदुरबार तालुक्यातील सातुर्खे व कानळदा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यात शिंदे गट शिवसेना व भाजप यांच्यात सत्तेच्या वाटाघाटी झाल्या. त्यामुळे अशा ३८ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी सत्तेचा दावा केला आहे. यशात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचेही श्री. रघुवंशी यांनी सांगितले. (Gram Panchayat Election Result Fierce fighting in Nandurbar Political claims counterclaims and hegemony of power Nandurbar shahada dhanora navapur rajvihir election result declare nandurbar news)

Gram Panchayat Election 2022
Gram Panchayat Election Result: नांदगाव तालुक्यात प्रस्थापितांना ‘दे धक्का’!

नंदुरबार तालुक्यात निकालानंतर नेत्यांचे विजयाचे दावे-प्रतिदावे

नंदुरबार तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. २०) जाहीर झाला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी तहसील कार्यालय परिसरात जल्लोष केला. त्यानंतर आपापल्या पक्षाचा नेत्यांच्या भेटीला गेले. त्यावरून राजकीय नेते आपापल्या परीने ग्रामपंचायतीवर सत्तेसाठी दावे-प्रतिदावे करीत आहेत.

येथील तहसील कार्यालयात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी दहापासून नऊ टेबलांवर सात फेऱ्यांमध्ये १८ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. त्यात एक ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाली होती. त्यामुळे १७ ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. दुपारी एकपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. त्यात गाव व विजयी सरपंचांचे नावे अशी ः कोठडा- मनीषकुमार सुरेश पाडवी, सातुर्खे- वंदनाबेन हिरालाल पाटील, खैराळे- उकीसिंग मनशा गांगुर्डे, रनाळे- नलिनी जितेंद्र ओगले, धानोरा- रीना प्रकाश पाडवी, चौपाळे- नामदेव फका भिल, ढंढाणे फुलसिंग हारसिंग ठाकरे, घोटाणे- सचिन मगन धनगर, करणखेडा- जमिला बद्या भिल, रजाळे- राजू देवचंद मराठे, तलवाडे बुद्रुक विद्या दिनेश पाटील, आसाणे- सीमा शरद पाटील, तिसी- दिलीप पोपट पाटील, घुली- कुसुमबाई बाबूराव ठाकरे, राकसवाडे- अविनाश अंबरसिंग भिल, ओसर्ली- जयश्री अमोलसिंग गिरासे, अमळथे- रमणबाई गुलाब कोळी आदींची लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी जाहीर केली.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Gram Panchayat Election 2022
Nandurbar News : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांना मंजुरी

जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा

जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. २०) जाहीर झाला. त्यात जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींवर काँग्रेस पक्षाची सत्ता प्रस्थापित झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते व माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक, ॲड. पद्माकर वळवी यांनी केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे यांनीही सात ग्रामपंचायतींवर सत्तेचा दावा केला आहे.

काँग्रेसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आत्ताच हाती आलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ११७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या होत्या. ग्रामपातळीवरील निवडणुकांमध्ये पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या जात नाहीत असे असले तरी पक्ष पुरस्कृत आणि तालुक्यातील आजी-माजी आमदार यांच्या व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने पुरस्कृत केलेल्या पॅनलप्रमाणे निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या वर्षी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी, तसेच माजी मंत्री पद्माकर वळवी आणि आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष पुरस्कृत लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची निवड झालेली आहे.

या निवडणुकीत अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या १६ ग्रामपंचायती, धडगाव तालुक्यात २१ ग्रामपंचायती, नवापूर तालुक्यात दहा ग्रामपंचायती आणि शहादा तालुक्यात चार ग्रामपंचायती अशा एकूण ५१ ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये इतर ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते सदस्यपदावर निवडून आलेले आहेत. त्याची माहिती यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अभिनंदन करण्यात येत असल्याचे कार्याध्यक्ष आमदार शिरीषकुमार नाईक यांनी म्हटले आहे.

सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांच्या खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडीबरोबरच धडगाव तालुक्यातील सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व राखीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी दिली.

दावा केलेल्या ग्रामपंचायती व सरपंचांची नावे ः सीताराम नूरला पावरा (सरपंच, खडकी), गीता भरसिंग पावरा (सरपंच, झापी),

भुरका मास्तर पावरा (सरपंच, भादल), सोमाबाई संदीप पावरा (सरपंच, सिंधीदिगर), सैमाल सरदार पावरा (सरपंच, बाबरी), लावीबाई शिवाजी पावरा (सरपंच, उडधा), इंदाबाई सायसिंग चौधरी (सरपंच, तोरणमाळ).

Gram Panchayat Election 2022
Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये चुरशींच्या लढतींत कही खुशी कही गम!

धानोरा ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व

धानोरा ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या पंचरंगी लढतीत आदर्श ग्रामनिर्माण पॅनलने दणदणीत विजय संपादित करत सत्ताधारी पक्षाचा एकतर्फी धुवा उडवीत परिवर्तन घडवून आणले. चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श ग्रामनिर्माण पॅनलने दणदणीत विजय मिळविला. मागील तीन पंचवार्षिक धानोरा गावात भाजपची एकहाती सत्ता असतानाही दारूण पराभव झाला. रीना प्रकाश पाडवी एक हजार २२० मते मिळवून लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी नीलम वसावे (१,१७०), येशूबाई गणेश वसावे (३४५), विद्या महेश वसावे (८५), संगीता योहान वळवी (३८४) यांचा पराभव झाला. विजयी सदस्य ः पाडवी मनोज सुदाम (४०९), चंद्रकला रवींद्र वसावे (३८१), सुमन देवीदास पवार (३८३), गायत्री जितेंद्र पवार (४४७), सारिका किसन वळवी (४०६), गजमल वेड्या पाडवी (३४९), तानाजी गौंजी वसावे (३०८), मंजुळा करणसिंग वसावे (२५१), मीना मनोहर वसावे (२२७), शक्तीसिंग मोहन वसावे (१९२), रविकांत मोहन वसावे (२८६), सुरेश रतन तिजवीज (३६७), रजनी शक्तीसिंग वसावे (३८५). एकूण १३ उमेदवारांपैकी सरपंचपदासह नऊ सदस्य शिंदे गटाचे निवडून आले, फक्त चार सदस्यांवर भाजपला समाधान मानावे लागले.

Gram Panchayat Election 2022
Gram Panchayat Election: धुळे जिल्ह्यात कुठे भाजप कुठे काँग्रेस तर कुठे मविआचे वर्चस्व

नवापूरला कुणाचाच दावा नाही

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी (ता. २०) जाहीर झाला. यात गंगापूर ही ग्रामपंचायत आधीच बिनविरोध झाली होती. १६ पैकी कोणत्या ग्रामपंचायती काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या की भाजपच्या याबाबत कोणीही ठाम दावा केला नाही. निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनीदेखील याबाबत बोलणे टाळले.

मंगळवारी सकाळी दहाला तहसीलदार कार्यालयात मतमोजणीला सुरवात झाली. पंधरा ग्रामपंचायतींचा दोन टप्प्यांत मतमोजणी दुपारी साडेबारापर्यंत झाली. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी निकाल जाहीर केले.

ग्रामपंचायत आणि नवनियुक्त सरपंच असे ः

गंगापूर : निकिता शैलेश वसावे

शेही : संगीता प्रकाश कोकणी

शेगवे : रमिला करणसिंग पाडवी

बेडकी : निर्मला विनायक गावित

पाटी : रशिला तुषार वळवी

करंजवेल : ईल्पेश गणपत वसावे

वाटवी : वता विल्पेश वळवी

नानगीपाडा : पल्लवी तुकाराम गावित

विसरवाडी : यशस्विनी दीपेश गावित

खेकडा : अमिषा अर्जुन मावची

अन्ठीपाडा : जयदीप मगन वसावे

वावडी : बाजूबाई भूपेंद्र वसावे

वऱ्हाडीपाडा : रामदास महादू गावित

भांगरपाडा : यशोदा जयंत पाडवी

खडकी : शिल्पा अंकुश गावित

वाटवी ( खांडबारा) : अरुणा विलास कोकणी

सकाळपासूनच १६ ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर गर्दी केली होती. निकाल लागत गेले तसा विजयी उमेदवार आणि समर्थकांनी जल्लोष साजरा केला. पहिल्या फेरीमध्ये आठ ग्रामपंचायती, तर दुसऱ्या फेरीत सात ग्रामपंचायती असा निकाल जाहीर झाला. १६ ग्रामपंचायतींपैकी गंगापूर ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. मंगळवारी फक्त १५ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर करण्यात आले. सकाळी दहाला तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरवात झाली. टप्प्याटप्प्याने उमेदवारांना पोलिस प्रवेशद्वाराजवळ उभे राहून सोडत होते.

या ग्रामपंचायतीच्या मतमोजणीप्रसंगी तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, सुरेखा जगताप, मिलिंद कुलकर्णी लक्ष ठेवून होते. मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज पाटील, अशोक मोकळ, विसरवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन पाटील व पोलिस कर्मचारी लक्ष ठेवून होते.

Gram Panchayat Election 2022
Dhule News : ‘त्या’ जागेच्या हक्काबाबत प्रस्ताव मनपाच्या महासभेपुढे

राजविहीर ग्रामपंचायत स्थापनेनंतर पहिल्यांदाच भाजपची सत्ता

ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर तब्बल ६४ वर्षांनंतर पहिल्यांदाच या ठिकाणी भाजपने सत्ता संपादन करण्यात यश मिळविले आहे. भाजप पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनलने सरपंचपदांसह सदस्यपदांचा सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळवून काँग्रेस पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडविला आहे. सरपंचपदासाठी उषा वळवी विजयी झाल्या आहेत.

तळोदा तालुक्यातील राजविहीर ग्रामपंचायतीची स्थापना १९५९ मध्ये करण्यात आली असून, तेव्हापासून येथे आजतागायत काँग्रेसची एकहाती सत्ता होती. अनेकदा या ठिकाणी भाजपने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करून बघितला मात्र त्यात ते अपयशी ठरले होते. यंदा मात्र प्रथमच भाजपने या ठिकाणी सत्ता प्रस्थापित केली आहे. मंगळवारी (ता. २०) येथील तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गिरीश वखारे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी एस. एन. सरगर यांनी मतगणनेचे कामकाज पाहिले. त्यात भाजप पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार उषा आकाश वळवी यांनी विजय मिळविला. तसेच सदस्यपदांसाठी प्रकाश पाडवी, शारदाबाई नाईक, सावित्री वसावे, अंजूबाई पाडवी, चेतन पाडवी, मंगलसिंग पाडवी, गुलाबसिंह पाडवी, सुमनबाई पाडवी, सरला वळवी अशा सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळवून काँग्रेस पुरस्कृत ग्रामविकास पॅनलवर एकतर्फी विजय मिळविला आहे.

दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश वळवी व माजी पंचायत समिती सभापती आकाश सतीश वळवी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ६४ वर्षांनंतर राजविहीर येथे प्रथमच भाजपची सत्ता स्थापन झाल्याने भाजपत उत्साह दिसून आला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करीत जल्लोष केला.

Gram Panchayat Election 2022
Gram panchayat Election : प्रस्थापितांना धक्का अन् तरुणांना संधी!

‘शहादा, तळोद्यात भाजपचे

नऊ ग्रामपंचायतींत वर्चस्व’

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दहापैकी आठ, तर तळोदा तालुक्यातील राजविहीर ग्रामपंचायतीवर यश मिळविल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास दाखविला असून, विकासापासून एकही गाव वंचित राहणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, विकास प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्याचा माणस राहणार असून, जनतेने एकहाती सत्ता दिल्याने गावाच्या विकासाला बाधा येत नाही. त्यामुळे नवीन योजना व उपक्रम पोचविले जातील, असेही आमदार राजेश पाडवी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. शहादा तालुक्यातील पाडळदा, बहीरपूर, म्हसावद, बिलाडी त.ह., निंभोरा, खैरवे भडगाव, धांद्रे बुद्रुक, कलमाडी त.बो., तर तळोदा तालुक्यातील राजविहीर या ग्रामपंचायतींवर भाजपचे लोकनियुक्त सरपंच व सदस्य निवडून आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Gram Panchayat Election 2022
Gram Panchayat Election : देवळ्यात तरुणांकडे गावकारभाऱ्याच्या चाव्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com