Dhule News : ग्रामपंचायतीचा कर भरणा आता ऑनलाइन

UPI Payment
UPI Payment esakal

Dhule News : केंद्र शासनाने शासकीय कामात पारदर्शकता यावी व सरकारी कार्यालयातील कामकाज पेपरलेस पद्धतीने व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे.

त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीने महाई-ग्राम संकेतस्थळ व सिटिझन ॲप सुरू करून ग्रामपंचायतीचा संपूर्ण व्यवहार ऑनलाइन केला आहे. (Gram Panchayat tax payment will online dhule news)

या पुढील टप्प्यात नागरिकांना ग्रामपंचायतीचा कर कॅशलेस पद्धतीने भरता यावा, यासाठी १५ ऑगस्टपासून क्यूआर कोड यूपीआयच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपले आर्थिक व्यवहाराचे खाते भीम यूपीआयला (Bim UPI) संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत़.

ग्रामपंचायतीचा व्यवहार करताना अधिकाधिक डिजिटल पेमेंट व यासाठी यूपीआय इनेबल करण्याच्या सूचना केंद्र शासनाच्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

UPI Payment
Dhule News: देऊरला रानडुकरांकडून डाळिंब बागेचे नुकसान; साडेसहा एकर क्षेत्रातील डाळिंबांचा फडशा

पंचायत समितीमार्फत तसा आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आला असून, याबाबत संबंधित बँकेशी संपर्क करून ग्रामपंचायतीने तसा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.

"ग्रामपंचायतींचा आर्थिक व्यवहार डिजिटल पेंमेंटच्या माध्यमातून व्हावा, यासाठी पंचायतराज संस्था प्रयत्नशील असून, ग्रामपंचायतीचा स्वनिधी हा ग्रामस्थ व ग्रामपंचायत असा थेट असल्याने सिटिझन ॲपच्या माध्यमातून जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंद व दाखले अशी सर्व माहिती सहज उपलब्ध होत असून, सिटिझन ॲपचा वापर जास्ती जास्त नागरीकांनी करून ग्रामपंचायत पेपरलेस करून सहकार्य करावे." -संजय सोनवणे, गटविकास अधिकारी

UPI Payment
Dhule News : सर्रास पैसे मागण्याची हिंमत कशी? महापालिकेतील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com