सटाण्यात राष्ट्रपिता गांधी व शास्त्री यांना अभिवादन

सटाणा : येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना प्राचार्या एस. बी. मराठे व उपप्राचार्य सुरेश भामरे. समवेत शिक्षक.
सटाणा : येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना प्राचार्या एस. बी. मराठे व उपप्राचार्य सुरेश भामरे. समवेत शिक्षक.

सटाणा (नाशिक): सटाणा शहर व तालुक्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शाळा -महाविद्यालयांमध्ये आज (मंगळवार) राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात आज 'स्वच्छता अभियान' राबवून महात्मा गांधीना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.

लोकनेते पं .ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूल येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक ए. डी. सोनवणे व पर्यवेक्षक श्री. डी. डी. पगार यांच्या हस्ते राष्ट्रपिता गांधी व माजी पंतप्रधान गांधी लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या जीवनावरील विविध भजने सादर केली. यावेळी झालेल्या वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गांधी व शास्त्री यांच्या जीवनावर भाषणे केली. आर. डी. शिंदे व बी. टी. वाघ यांची भाषणे झाली. यानंतर शालेय आवारात स्वच्छता अभियान राबविले. कार्यक्रमास, ए. एस. देसले, ए. ए. बिरारी, एस. आर. भामरे, एच. डी. गांगुर्डे, एस. ए. सोनवणे, डी. पी. रौंदळ, सी. डी. सोनवणे, व्ही. के. बच्छाव, सुजाता मगर, यशवंत भदाणे, शेखर दळवी, एच. एन. कोर, एस. एस. कदम, एम. डी. निकुंभ, वैशाली कापडणीस, ए. एस. पाटील, एस. जे. पाटील, रोहित शिंदे, अश्विन पाटील, एस. डी. पाटील, एन. जी. जाधव आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

जिजामाता गर्ल्स हायस्कूल
येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्या एस. बी. मराठे व उपप्राचार्य सुरेश भामरे यांच्या हस्ते राष्ट्रपिता गांधी व माजी पंतप्रधान शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सत्य व अहिंसेची शिकवण देणाऱ्या महापुरूषांच्या विचारांची आज समाजाला खरी गरज असून विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन श्रीमती मराठे यांनी केले. विद्यार्थिनींनी विविध भजने सादर केली. कार्यक्रमास पर्यवेक्षक पर्यवेक्षिका बी. बी. सावकार, एस. जे. देवरे, एम. बी. सोनवणे, वाय. एन. पवार, सी. ए. वाघ, एस. एन. सोनवणे, एस. डी. शिंदे, जे. आर. पाटील, धनंजय सोनवणे, एम. डी. शिंदे, जी. बी. भामरे, बी. जे. पवार, ए. बी. खरे, अमृता पवार, आर. डी. आहेर, एस. के. जाधव, व्ही.ए. खैरनार, एस. बी. पाटील आदींसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. ज्योती जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यानंतर विद्यार्थिनी व शिक्षकांनी स्वच्छता अभियान राबविले.

अभिनव बालविकास मंदिर
येथील मविप्र संचालित अभिनव बालविकास मंदिर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक के. के. तांदळे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आजच्या पिढीने अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे आवाहन श्री. तांदळे यांनी केले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमास क्रांती अहिरे, मंगला शेवाळे, मनीषा देवरे, सुप्रिया देवरे, मनीषा सोनवणे, जयश्री निकम, श्रुती पाटील, सविता पगार, शरद गुंजाळ, नरेंद्र मोरे, बाळासाहेब पवार, स्वप्नील पवार आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रगती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय
येथील प्रगती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक एस. बी. कोठावदे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता ४ थी ची विद्यार्थिनी भूमिका जाधव होती. यावेळी वर्षा चौधरी, चैत्राली पगार यांच्यासह अविका सोनवणे, विरेंद्रसिंग दातरे, अर्णव डोईफोडे, दीपशिखा देशमुख, तनुश्री गांगुर्डे, वैभवी बिरारी, अथर्व खैरनार, ओम खैरनार, भूमिका जाधव, विनीत रौंदळ या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व शास्त्री यांच्या जीवनावर भाषणे केली. कार्यक्रमास मुख्याध्यापक अतुल अमृतकार, के. जी. डोईफोडे, व्ही. पी. भामरे, आर. बी. नेरकर, डी. ए. मोरे, एस. जे. गांगुर्डे, ए. आर. अहिरे, आर. पी. देसले, सी. एम. बेडसे, बी. ए. पवार, एन. बी. सोनवणे, एस. डी. रौंदळ आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था
भाक्षी (ता.बागलाण) येथील श्री खंडेराव महाराजांच्या गड पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलीत मल्हार हिल कँम्पस मधील प्राथमिक विद्यामंदिरमध्ये सुरेश येवला यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक पंकज दातरे यांनी या महापुरुषांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या वकृत्व स्पर्धेत ५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे, किरण सोनवणे, नंदकिशोर शेवाळे, गोकुळ दातरे, शेखर अहिरे, ज्ञानेश्वर सोळूंके, अमोल गातवे, सूर्यवंशी रोहिणी, स्वाती दातरे, सारिका शिंदे, सपना भामरे, विशाखा सोनवणे, मोहिनी रौंदळ, योगिता घोडे, हर्षाली मोरे, धनश्री ठोके, कल्याणी गायकवाड, वैशाली मोरकर, मयुरी सोनवणे, मीनाक्षी शिंदे, दिनेश आहेर, उषा रौंदळ, साहेबराव खैरनार, सजन देवरे, आबा शिंदे, योगेश खैरनार, किरण पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर अहिरे यांनी केले.

मोना एज्युकेशन अँड वेल्फेयर सोसायटी
ताहाराबाद (ता. बागलाण) येथील मोना एज्युकेशन अँड वेल्फेयर सोसायटी संचालित व आयएसओ मानांकित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा व बालविकास मंदिर तसेच माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती आज मंगळवार (ता.२) रोजी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दौलतराव गांगुर्डे होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रपिता गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस अंजली गांगुर्डे, उपाध्यक्ष डॉ. भुषण गांगुर्डे, सहसचिव डॉ. अक्षय गांगुर्डे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक हर्षल पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रफुल्ल जाधव, इंग्लिश माध्यमाच्या मुख्याध्यापिका रत्ना शिंदे उपस्थित होत्या. निवडक विद्यार्थ्यांनी गांधी व शास्त्री यांच्या जीवनावर भाषणे केली. अरुणा ठाकरे, सुनील निकुंभ, चेतन दाणी, राहुल जाधव, प्रकाश मोरे, विकास मानकर, संगीता वाणी, तीर्थराज खैरनार, सारिका अहिरे, संजय गर्दे, मनीषा सोनवणे, अजय पवार, मनोहर खैरनार, मनोहर गांगुर्डे, हेमंत भदाणे, माहेश्वरी महाले, मनीषा नंदन, प्रियंका गवळी आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, संस्थेच्या मुंजवाड (ता.बागलाण) येथील ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक विद्यालय तसेच ड्रिम्स् इंटरनॅशनल (सी. बी. एस. ई.) स्कुलमध्ये गांधी व शास्त्री या महापुरुषांची जयंती साजरी झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दौलतरा गांगुर्डे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. मुख्याध्यापिका रत्ना शिंदे यांनी गांधी व शास्त्रींच्या जीवनावर भाषण केले. महेंद्र मांडवडे, सुजाता बागुल, किरण गांगुर्डे, संकेत सुर्यवंशी, हर्षाली जगदाळे, हर्षाली खैरनार, भदाणे संगिता, अनिता बागुल, केतन महाजन आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com