गुजरात सीमेवर दिसलेला तो वाघ की बिबट्या 

सुनील सूर्यवंशी
Monday, 23 December 2019

चिंचपाडा , खांडबारा, वनक्षेत्रात हरीण , व तृणभक्षी वन्य जीव आढळून आले असून या या वन्यजीव साठी आवश्यक खाद्य असणारे गवत वनक्षेत्रात पाणवठे, व मानवी हस्तक्षेप नसल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना नुकतेच या वन्यजिवांचे अस्तित्व आढळून आले आहे, त्यामुळे आता सत्य समोर येणे आवश्यक झाले आहे 

तळोदा : महाराष्ट्र व गुजरात राज्याचा हद्दीत नवागाव परिसरात एका वाहन चालकाला मध्यरात्री पट्टेदार वाघ दिसल्याचा दावा केला असून वन विभागाने मात्र सदर ठसे हे बिबट्याचे असल्याचे सांगितले आहे, नवापूरजवळील नवागाव भागातील वनक्षेत्रात रात्री दीड वाजेच्या सुमारास वाहन चालकाला या मार्गावर बिबट महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतून गुजरात हद्दीत जात असतांना दिसला. 

दरम्यान हा वन्य जीव पट्टेदार वाघच होता असा दावा प्रत्यक्षदर्शी वाहनचालक संदीप वसावे यांनी केला आहे. बिबट व पट्टेदार वाघ यांतील फरक मी ओळखतो असेदेखील त्यानी ठामपणे सांगितले असल्याने पुन्हा एकदा वाघ की बिबट याबाबत स्थानिक व वनविभाग यांच्यात एकमत होताना दिसत नाही. 

पहा > खोदकाम करताना सोन्याचे दागिने मिळाले... 

चिंचपाडा वनक्षेत्रात जुलै २०१८ ला पट्टेदार वाघ आढळून आला होता. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश या तिन्ही राज्यांचा वन विभागाने एकत्रितपणे सीमावर्ती भागात विशेष मोहीम राबवून पट्टेदार वाघाचे अस्तित्व शोध मोहीम राबवली पाहिजे. पट्टेदार वाघ येण्यासाठी आवश्यक पोषक वातावरण व शिकार या भागात असल्याने वाघाचे अस्तित्व अधोरेखित होते, मात्र आता या भागात काही महिन्यापूर्वी वन विभागाला एक मोठा तृण भक्षक वन्यजीव हरीणचा थवा दिसून आल्याने कोकणी पाडा भागात पट्टेदार वाघ या तृणभक्षी प्राण्याचा मागोवा घेत या क्षेत्रात आल्याचे स्पष्ट संकेत मिळतात, एकूणच या तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर वाघ असल्याचे दिसून येते. 
नवापूर तालुक्यातील नंदुरबार नवापूर चिंचपाडा खांडबारा वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुमारे साठ हजार हेक्टर वन जमीन असलेले सदर वनांचे संरक्षण संवर्धन वन कर्मचाऱ्यांसह सुमारे शंभर संयुक्त व्यवस्थापन समितीने चांगल्या पद्धतीने केल्याने सदर जंगलामध्ये स्थानिक गवताच्या प्रजाती उदा, मारवेल, पहुण्या, सेड्या, हीमेटा, कुसळ, रोयसा इत्यादी प्रजाती वाढल्यामुळे तृणभक्षी वन्य प्राणी उदा हरण बेकर चिंकारा काळवीट यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सहाजिकच मांसभक्षक प्राण्यांचेही प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे. 

नवागाव येथे काही स्थानिकांना दिसलेला वन्यजीव हा पट्टेदार वाघ नसून बिबट्या असल्याचे त्याचा ठसा वरून ठसे तज्ञाकडून सांगण्यात आले आहे, तरी देखील या क्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी सतत गस्त घालत असून पट्टेदार वाघ मागील काळात दिसला असला तरी नंतर त्याचे कोणतेही अस्तित्व वन विभागाला आढळून आलेलं नाही. 
गणेश रणदिवे, उपवन संरक्षण नंदुरबार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gujrat border forest aria tiger bibtya tadoda news