''खोदकाम करताना सोन्याचे दागिने मिळाले''...'एवढ्याला' विकायचे सांगत...

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 23 December 2019

बोरगड परिसरातील अवतार पॉइंट येथील हरिचरण सोसायटीत राहणारे हर्षल मोहनलाल छाजेड यांचे अरिहंत जनरल स्टोअर्स आहे. शनिवारी (ता. 21) संशयिताने मला खोदकाम करताना सोन्याचे दागिने मिळाले असून, एक सोन्याची गिनी दाखवत सर्व सोने मला 70 हजार रुपयांत विकायचे आहे, असे सांगितले.

नाशिक : बनावट सोन्याचे दागिने विक्री करणाऱ्या संशयितास म्हसरूळ पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. 

अशी घडली घटना...

बोरगड परिसरातील अवतार पॉइंट येथील हरिचरण सोसायटीत राहणारे हर्षल मोहनलाल छाजेड यांचे अरिहंत जनरल स्टोअर्स आहे. शनिवारी (ता. 21) संशयिताने मला खोदकाम करताना सोन्याचे दागिने मिळाले असून, एक सोन्याची गिनी दाखवत सर्व सोने मला 70 हजार रुपयांत विकायचे आहे, असे सांगितले. रविवारी (ता. 22) संशयिताने दाखविलेली सोन्याची गिनी सोनारास दाखविली असता ती बनावट असल्याचे समजले. यावरून संशयितास खोटे सोने विक्री करतो, अशी विचारणा केली असता त्याने पळ काढला; परंतु परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले.

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

तीन हजारांचा मुद्देमाल जप्त.. 

ही घटना पोलिसांना कळविली असता, गुन्हे शोधपथकाचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल माळी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार सुरेश माळोदे, पोलिस नाईक किशोर दराडे, रोकडे यांनी घटनास्थळावरून संशयित धनाराम मन्साराम सोलंकी (वय 34, रा. बिबलसर, ता. जि. जालोट, राजस्थान) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट सोन्याच्या दोन माळा असा एकूण तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सुरेश माळोदे तपास करीत आहेत.

हेही वाचा > शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

हेही वाचा > पक्षातून फुटलेल्यांना पदे...अन् आम्हाला फक्त शिस्तीचे धडे काय? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspect arrested for selling fake gold jewelry Nashik Marathi News