
Dhule News : मच्छीबाजार परिसरातून 2 लाखांचा गुटखा जप्त
धुळे : शहरातील मच्छीबाजार परिसरात पोलिस उपअधीक्षक हृषिकेश रेड्डी यांच्या पथकाने कारवाई करत राज्यात प्रतिबंधित दोन लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले. शनिवारी (ता. २४) दुपारी ही कारवाई झाली.
पोलिस उपअधीक्षक रेड्डी यांना माहिती मिळाल्यावर शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास मच्छीबाजार परिसरात स्लॅटर हाऊसमागे शकील अन्वर अब्दुल खाटीक (रा. मच्छीबाजार) याला पोलिस पथकाने ताब्यात घेतले. (Gutkha worth 2 lakhs seized from Machhi Bazar area Jalgaon News)
हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?
हेही वाचा: Nashik Crime News : चोरीछुप्या हुक्का पार्लर चालविणाऱ्या हॉटेलवर छापा; सापडल मोठ घबाड
त्याच्याकडून प्रतिबंधित विविध प्रकारचा गुटखा व तंबाखूची पाकिटे, असा एक लाख ९२ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित शकील खाटीक याला आझादनगर पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हा दाखल केला.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रेड्डी, दत्तात्रय उजे, राजेंद्र मांडेकर, जितेंद्र आखाडे, कबीर शेख, कर्नल चौरे, विवेक वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा: Nashik News : जिल्हा मजूर फेडरेशनच्या 12 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात