आवक वाढल्याने हापूस नाशिककरांच्या आवाक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नाशिक - कोकणातील अस्सल रसाळ हापूस आता नाशिककरांच्या आवाक्‍यात आला आहे. त्याची आवक वाढल्याने तीनशे ते सहाशे रुपये डझन हापूस आता मिळू लागला आहे. 

नाशिक - कोकणातील अस्सल रसाळ हापूस आता नाशिककरांच्या आवाक्‍यात आला आहे. त्याची आवक वाढल्याने तीनशे ते सहाशे रुपये डझन हापूस आता मिळू लागला आहे. 

गेल्या महिन्यात अक्षयतृतीयेपासून नाशिककर अस्सल हापूस आंब्याची प्रतीक्षा करीत होते. मात्र, अक्षयतृतीयेलाच बहुतांश आंबा विकला गेल्याने अनेकांना इतर आंब्यावर अक्षयतृतीय साजरी करावी लागली. तसेच, हापूसचे भावही सातशे ते दोन हजार ४०० रुपये डझन होते. त्यामुळे हापूसचा मोह आवरावा लागत होता. मात्र कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे सुरू असलेल्या आंबा महोत्सवात अस्सल हापूसची आवक वाढली असून, तीनशे ते सहाशे रुपये डझनने आता हापूस मिळत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही अस्सल हापूसचा स्वाद चाखू लागले आहेत. दोन- तीन दिवसांत आंबा अडीचशे ते तीनशे रुपये डझनपर्यंत येण्याची शक्‍यता आहे. १३ मेपर्यंत आंबा महोत्सव चालणार आहे. यादरम्यान बहुतांश कच्चे आंबे येणार असून, ते ग्राहकांना घरी पिकवून त्याचा अस्वाद घेता येणार आहे. आतापर्यंत साडेपाच हजार डझन आंबा नाशिककरांनी येथून नेला आहे, असे संयोजक दत्ता भालेराव यांनी कळविले आहे.

Web Title: hapus mango