शेतकरी माय-लेकाचा वीज कोसळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

हरसूल (ता. त्र्यंबकेश्‍वर) - जोरदार सरींसह वरुणराजाची हजेरी सुरू असताना गुरुवारी सायंकाळी वीज कोसळून शेतकरी माय-लेकाचा मृत्यू झाला. यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना वाघुळपाडा शिवारात घडली.

वाघुळपाडा येथील सोनीबाई पुंडलिक आंबेकर (वय 45) या थोरला मुलगा भाऊराव (वय 19) आणि धाकटा मुलगा अरुण (वय 14) यांच्या समवेत शेतात काम करत होत्या. शेतात वीज कोसळून सोनीबाई यांच्यासह अरुण हे ठार झाले. यात भाऊराव गंभीर जखमी झाला. अरुण सातवी उत्तीर्ण झाला असून, नवीन शैक्षणिक वर्षापासून आठवीत शिकायला जाणार होता. शाळेला सुट्या असल्याने तो आईसमवेत शेतात गेला होता.

Web Title: harsul nashik news farmer death by lightning