तंबाखूची पुडी घेण्यास गेला आणि जीव गमावला 

दीपक कच्छवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मेहूणबारे येथे एका हॉटेलमध्ये काम करणारा वेटर तंबाखूचे व्यसन पूर्ण करण्यासाठी दुचाकीने दुकानावार जात असताना भरधाव येणार्‍या पीकअपने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री 11 च्या सुमारास मेहूणबारे (ता. चाळीसगाव) येथील डेराबर्डी भागात घडली. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मेहूणबारे येथे एका हॉटेलमध्ये काम करणारा वेटर तंबाखूचे व्यसन पूर्ण करण्यासाठी दुचाकीने दुकानावार जात असताना भरधाव येणार्‍या पीकअपने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री 11 च्या सुमारास मेहूणबारे (ता. चाळीसगाव) येथील डेराबर्डी भागात घडली. 

दरम्यान, मेहूणबारे येथील हॉटेल निसर्गमध्ये आकाश संजय जाधव (वय 21,  रा. गौरोली, ता. मोताळा, जि. बुलढाणा) हा तरुण वेटरचे काम करत होता. ताे रात्री हॉटेलमध्येच थांबत असे. आकाश हा मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास दुचाकीवरून मेहुणबारे गावातीलच डेराबर्डी येथे तंबाखूची पुडी घेण्यासाठी गेला हाेता. धुळे-चाळीसगाव रस्त्याने तो जात असताना त्याच्या दुचाकीला मालवाहू पिकअपने जबर धडक दिली.

दरम्यान, त्यात आकाशच्या हातावर, छातीवर व कपाळावर गंभीर दुखापत झाली.  त्यास उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता, डाॅक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी विलास चव्हाण यानी दिलेल्या फिर्यादीवरून मालवाहू पीकअप चालक मुजाहिद्दीन समशोद्दीन काझी, (रा. काझी मोहल्ला, कन्नड, जि. औरंगाबाद) यांचे विरूद्ध मेहूणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: he lost life for tobacco in Jalgaon district