fraud doctor
fraud doctorsakal

Dhule Fraud Crime : तिखीत बोगस डॉक्टर; मोहाडी पोलिसांत गुन्हा

Dhule News : तिखी (ता. धुळे) येथे मंगळवारी रात्री आरोग्य विभागाच्या पथकाने बोगस डॉक्टरला पकडले. त्याच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्र हे अ‍ॅलोपॅथी नसल्याचे आढळले. तसेच सीएमएस या प्रमाणपत्राची वैधता संपल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. (health department team arrested bogus doctor Dhule Fraud Crime)

संग्रामसिंग कोलमसिंग देवरे (रा. सावळदे, ता. धुळे) असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याच्याविषयी धुळे पंचायत समितीच्या तालुका आरोग्याधिकारी डॉ. तरन्नुम पटेल यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहकारी पथक, बोरकुंड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल पावरा, आरोग्यसेवक शरद खैरनार यांच्या साथीने तिखी गाठले.

रात्री नऊला संग्रामसिंग देवरे हा फिरस्ती वैद्यकीय व्यवसाय संपवून निघण्याच्या तयारीत असतानाच पथकाने त्याला एका चौकात पकडले. चौकशीअंती त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

fraud doctor
Jalgaon Crime News : जनावरे चोरणाऱ्या टोळीकडून 18 गुन्हे उघडकीस

तेव्हा त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर वैद्यकीय प्रमाणपत्र दाखविले. मात्र ते अ‍ॅलोपॅथी नसल्याचे आढळले. त्यानुसार संग्रामसिंग देवरे याच्याविरोधात डॉ. कपिल पावरा यांच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

fraud doctor
Nandurbar Crime News : शेती अवजारे चोरणाऱ्या तिघांना अटक; चार गुन्हे उघडकीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com