वाढत्या ताणतणावामुळे हृदयरोग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नाशिक - बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. क्षुल्लक-क्षुल्लक कारणांमुळे ताणतणाव वाढतो. आहार, विहार आणि विचारांच्या असंतुलनामुळे काही वर्षांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण १५ टक्‍क्‍यांवर पोचले असून, त्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्‍यता आहे, अशी भीती हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी मंगळवारी (ता. २८) व्यक्त केली. 

सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात पुस्तक मित्रमंडळातर्फे डॉ. मनोज चोपडा लिखित ‘हृदयरोग आणि आपण’ या पुस्तकावर झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. 

डॉ. चोपडा म्हणाले, की हृदयरोग टाळण्यासाठी शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. १९८० पूर्वी हृदयरोगाचे प्रमाण अवघे पाच टक्के होते. त्यानंतर बदलती जीवनशैली अन्‌ वाढत्या ताणतणावामुळे १५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रमाण वाढले आहे. विशेषतः ३५ ते ५० वयोगटांमध्ये हृदयरोगाच्या झटक्‍याचे प्रमाण वाढले असून, गत दहा वर्षांत महिलांमध्येही हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. अत्यंत क्षुल्लक कारणावरून ताण घेण्याचे प्रमाण वाढल्याने हृदयरोगाला आपण निमंत्रण देत आहोत. सततच्या नकारात्मक विचारांमुळे हृदयरोगातील ब्लॉकेजेस वाढतात. ईसीजी नॉर्मल आला म्हणजे हृदयरोग नाही, असे म्हणणेही धाडसाचे आहे. रात्री टीव्ही वा मोबाईलचा अतिरेकी वापराचा हृदयावर विपरीत परिणाम होत आहे. 

पुस्तक मित्रमंडळाचे प्रमुख ॲड. मिलिंद चिंधडे, ‘सावाना’चे अध्यक्ष विलास औरंगाबादकर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. डॉ. चोपडा यांनी प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्‍नांचेही निराकरण केले.

असा असावा दिनक्रम... 
पहाटे पाच ते सकाळी सातपर्यंत व्यायाम, सकाळी सात ते नऊ नाश्‍ता, सकाळी नऊ ते दुपारी बारा नियमित कामकाज, दुपारी बारा ते दोन जेवण व वामकुशी, दोन ते सायंकाळी पाच नियमित कामकाज, सायंकाळी पाच ते रात्री आठ अन्य कामकाज, रात्री आठ ते नऊ रात्रीचे जेवण, रात्री दहा ते पहाटे पाच झोपणे.

पहाटे चार ते सहाया वेळेत हृदयरोगाचा झटका येऊन गतप्राण होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामागे शरीरातील बायोलॉजिकल रिद्‌म आहे. शरीरातील प्लेटलेट्‌स आणि स्नायू एकमेकांना चिकटलेल्या असतात. ताणतणाव आणि चुकीच्या आहारामुळे त्यात बिघाड होतो. या वेळेत शरीरासाठी व्यायाम अत्यावश्‍यक असतो. मात्र व्यायाम होत नाही. त्यामुळे याच वेळेत ॲटॅकचे प्रमाण वाढले आहे. 
- डॉ. मनोज चोपडा, हृदयरोगतज्ज्ञ

Web Title: Heart disease due to increasing stress