गिरणा परिसरात जोरदार पाऊस

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 23 जून 2018

पिलखोड (ता. चाळीसगाव) : गिरणा परिसरात शुक्रवारी(ता. 22) दुपारी अडीचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतीशिवारात अक्षरशः पावसाचे पाणी साचले होते. यामुळे नुकतेच बियाणे लागवड केलेल्यांना दिलासा मिळाला असून लागवडीच्या कामांना वेग आला आहे.

पिलखोडसह मांदुर्णे, सायगाव, उपखेड, तामसवाडी आदी भागात शुक्रवारी(ता. 22) दुपारी अडीचच्या सुमारास  पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे पाऊण तास चाललेल्या पावसामुळे परिसर पाणीमय झाला होता. शेतातील सऱ्यांमध्ये अक्षरशः पाणी साचलेले पाहायला मिळाले. गुरुवारी(ता. 21) रात्री काही भागात चांगला पाऊस झाला तर, काही ठिकाणी रिपरिप पाऊस पडला. 

ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी उपलब्ध होते, अशा काही मोजक्या शेतकऱ्यांनी कापसाची हंगामपूर्व लागवड केली आहे. याशिवाय सुरुवातीचे एकदोन पावसानंतरही काही शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली आहे. मात्र, पावसाच्या भरवशावर बरेच शेतकऱ्यांच्या लागवडी खोळबंल्या होत्या. त्या लागवडीच्या कामांना आता वेग येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: heavy rain in girana area