Dhule Rain Update : कापडणे, वडणे, निकुंभे परिसरात मुसळधार; उर्वरित पेरण्यांना येणार वेग

The form of a pond in the field due to heavy rains.
The form of a pond in the field due to heavy rains. esakal
Updated on

Dhule Rain Update : धुळे तालुक्यात एकादशीला पावसाने जोरदार सलामी दिली. त्यानंतर पुन्हा पावसाने आठवडाभर दडी दिली. आता पुन्हा पावसाने पुनरागमन केले. आता तालुक्यात जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. (heavy rain in Kapadne Vadane and Nikumbhe areas dhule news)

शुक्रवारी(ता.७) कापडणे, वडणे व निकुंभे परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने जमीन तृप्त झाली आहे. आता खऱ्या अर्थाने येत्या आठवडाभरात उर्वरित पेरण्या पूर्णत्वास येतील.

धुळे तालुक्यात एकादशीला पाऊस झाला. काही भाग कोरडाच होता. एक लाख सात हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ४४ हजार ३९९ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The form of a pond in the field due to heavy rains.
Dhule News : कोळसापाणीच्या चांदणीला आधार! भावाबहिणींची प्रशासन घेणार जबाबदारी

केवळ ४१ टक्के पेरण्या झाल्या. आता पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी जोरदार कोसळला.

तब्बल एक महिना उशिरा पेरण्या

यंदा मृग कोरडा गेला. आता एकादशीलाच पाऊस पडेल, ही आशा खरी ठरली. एकादशीला बहुतेक भागात पाऊस झाला. तर उर्वरित भागात आज धो-धो कोसळला. आता उर्वरित ५६ टक्के पेरण्यांना वेग येणार आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी उशीर झाल्याने मका पेरणीस प्राधान्य देत आहेत.

The form of a pond in the field due to heavy rains.
Dhule Rain News : धुळ्यासह तालुक्यात पावसाची दमदार हजेरी! भाजीपाल्याच्या दरात घसरणीची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.