नाशिक : माणिकपुंज परिसरात मुसळधार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

एरवी पहिल्या पावसातच भरणारे धरण अशी ख्याती असलेल्या माणिकपुंज धरणाच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहू लागल्याने आनंदी वातावरण आहे.

नांदगाव : एरवी पहिल्या पावसातच भरणारे धरण अशी ख्याती असलेल्या माणिकपुंज धरणाच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहू लागल्याने आनंदी वातावरण आहे. त्यासाठी  परतीच्या पावसापर्यंत प्रतीक्षा करावी लागली ३० आगस्टपासून नांदगावसह तालुक्यातील विविध भागात बऱ्यापैकी हजेरी लावत असल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे आतापावेतो एकूण ३८० मिली एवढ्या पावसाची नोंद झाली आहे, अर्थात सरासरी एवढा पाऊस अद्यापही झालेला नाही मात्र सध्याच्या परतीच्या पावसाचा आवेग हा सरासरीच्या उद्दिष्टापलीकडे जाण्यास मदत होईल 

तालुक्यात असलेले गिरणा धरण हे उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठे असून तेरा वर्षाच्या कालावधीनंतर ते ओसंडून वाहत आहे गिरणा  खोऱ्याच्या कार्यक्षेत्रातल्या  लाभक्षेत्रात असलेल्यागावांमध्ये आमोदे,बोराळे मळगाव मंगळाने कळमदरी वेहेळगाव अशी पंचक्रोशीतली गावे तालुक्यातील असली तरी गिरणाच्या पाण्याचा सर्वाधिक लाभ खान्देशातील भागांना होत असतो मालेगाव-नांदगाव पालिकांच्या नळपाणी पुरवठा योजनांचा अपवाद वगळता या धरणातील पाण्याचा नांदगाव तालुक्यातील सिंचनासाठी अजिबात उपयोग होत नसतो सध्या या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे 

तालुक्यातील अन्य धरणातल्या जलसाठ्यात अपेक्षेएवढी वाढ होऊ शकलेली नाही मध्यम प्रकल्पातील नाग्यासाक्या धरण अजूनही भरलेले नाही मात्र माणिकपुंज धरण  ओसंडून वाहू लागले आहे. मदीवरील हे धरण पहिल्याच पावसात भरत असे मात्र मराठवाड्यात वरच्या भागात  नारळापारळा धरण झाल्याने यंदा माणिकपुंज भरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली माणिकपुंजचे पाणी जळगाव बुद्रुक कासारी बाणगाव कसाबखेडा जळगाव खुर्द हिंगणे देहरे आदी गावांना सिंचनासाठी उपयुक्त ठरले आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in manikpunj