उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; 14 तालुक्यांत अतिवृष्टी

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे.

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यानंतर आता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. पांझरा, बुराई, अरुणावती, तापी, अनेर, कान आदी नद्यांना महापूर आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील 14 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून, येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच जळगाव, धुळे व नंदुरबार येथे आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे. या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक महामार्ग ठप्प झाले आहे. 

दरम्यान, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागात महापूर आल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील 14 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in northern Maharashtra Precipitation in 14 taluka