धुळे : असा तुफान पाऊस पहिल्यांदाच पाहिला (व्हिडिओ)

Dhule
Dhule

शिरपूर : धुळे जिल्ह्यातील शिरपूरमधील जुने भामपूर येथे सोमवारी (24 जून) मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पांढरीचा नाल्याकाठची खळवाडी पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली. 40 वर्षांत प्रथमच एवढा पाऊस झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या पावसात दोन म्हशी, तीन बैलांचा मृत्यू झाला असून, लाखो रुपयांचा चारा, शेती अवजारे, खते, पाईप आणि गोठे पाण्यात वाहून गेले. रात्री पाऊस आला अन सगळं वाहून गेले, 40 वर्षांत पहिल्यांदा असा पाऊस झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सात शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. महिला शौचालयाची संरक्षण भिंत जमीनदोस्त झाली. वाघाडी ते विखरण परिसरात शेती पाण्याखाली असून नाले भरून वाहत आहेत. उखळवाडी आणि मुखेड या दोन लघुप्रकल्पामधून निघणारे नाले भामपूरजवळ एकत्र येतात. मध्यरात्री अडीचला या परिसरात ढगफुटीमुळे नाल्यात पाण्याचा लोंढा तयार झाला. पाईपवरून पाणी वाहत असल्यामुळे गावकऱ्यांना गुरे, गोठे वाचवण्यासाठी जाणे अशक्य झाले. महसूल विभागाने पंचनामा केला आहे.

यापूर्वी 23 जूनला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीत असताना ही घटना घडली. बैलजोड्या, शेती अवजारे वाहून गेल्याने पेरणी कशी करावी असा प्रश्न या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com