
Nandurbar News : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात गारपीट
न्याहली (जि.नंदुरबार) : नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसासोबत गारपीटही झाली. (heavy unseasonal rain with gale on Monday in nandurbar news)
सुदैवाने गारांचा आकार लहान असल्यामुळे मोठी हानी टळली. होळीदेखील पावसातच पेटवावी लागली. न्याहलीसह परिसरात दुपारी साडेचार ते सहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार बिगरमोसमी पाऊस झाला. पावसासोबत वादळी वारा आणि गारपीटही झाली.
चिंचोक्याच्या आकाराच्या गारा असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले. वादळी वारा व जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचा परिपक्व झालेला गहू, हरभरा, कांदे, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
मळणीसाठी कापून ठेवलेला हरभरा पावसात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. होळी पेटण्यापूर्वीच जोरदार पावसाला सुरवात झाल्यामुळे होळीच्या आनंदावरही विरजण पडले. पावसातच होळी पेटविण्याची कसरत ग्रामस्थांना करावी लागली.