Dhule Crime News : मोहाडीमधील तरुणाचा शिरच्छेद करत निर्घृण खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

Dhule Crime News : मोहाडीमधील तरुणाचा शिरच्छेद करत निर्घृण खून

धुळे : काही दिवसांवर विवाह सोहळा असलेल्या उपवर तरुणाचा शिरच्छेद करून निर्घृण खून (Murder) झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. २३) उघडकीस आली. (Heinous murder of youth in Mohadi by beheading dhule crime news)

मारेकऱ्यांनी संबंधित तरुणाचे शीर धडावेगळे करत अज्ञातस्थळी फेकून दिले असावे अथवा कुत्र्यांनी ते नेले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सतीश बापू मिस्तरी (वय २८, रा. नित्यानंदनगर परिसर, मोहाडी, धुळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. निवृत्त पोलिस कर्मचारी महेंद्र माणिक वाघ हे गुरुवारी (ता. २३) सकाळी अकराच्या सुमारास अवधान शिवारातील सोना दोर कंपनीच्या मागील बाजूस बकऱ्या चारण्यासाठी गेले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

तेव्हा त्यांना मृतदेह दिसला. त्यांनी मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते, हेमंत राऊत, किरण कोठावदे, बापूजी पाटील, मुकेश मोरे, राहुल गुंजाळ, विजय चौधरी, चेतन माळी, जयेश पाटील तसेच, एलसीबीचे प्रकाश पाटील, बाळासाहेब पाटील, रवींद्र राठोड, कुणाल पानपाटील, विशाल पाटील, उमेश पवार, संदीप सरग, श्रीशैल जाधव, सुरेश भालेराव घटनास्थळी दाखल झाले.

मृत सतीशच्या शिराचा शोध घेतला जात आहे. ज्या ठिकाणी खून झाला तेथून जवळच बियरचे तीन टीन आणि तीन प्लास्टिक ग्लास आढळून आले. त्यामुळे तरुणाचा खून परिचितांनी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत सतीश मिस्तरी याच्या एका हातावर सतीश असे नाव लिहिलेले, तर दोन्ही हातावर टॅटू काढलेला आहे.

त्याला दोन भाऊ आहेत. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. मृत सतीश हा रिक्षाचालक होता. त्याच्या खुनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Dhulecrimemurder case