चाळीसगावात 44 लाखांचा गांजा पकडला; तिघांना अटक

चाळीसगावात 44 लाखांचा गांजा पकडला; तिघांना अटक

चाळीसगाव : चाळीसगाव शहरापासुन जवळच असलेल्या ओझर येथे मोठ्या प्रमाणावर गांजा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत आज (ता. 9) शनिवारी सकाळी 44 लाख 47 हजार 500रुपये किंमतीचा गांजा जप्त करुन तिन संशयीतांना अटक करण्यात आली.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहराजवळील ओझर येथे इनोव्हा व महेंद्रा कार जप्त करत एकूण मुद्देमालाची किंमत 70 लाख 70 हजार 500 रुपये असल्याचे सांगण्यात आले. संशयीत म्हणुन शुभम किरण राणा (22,मराठा मंगल कार्यालयासमोर,चाळीसगाव), भूषण केशव पवार (32, दाळवाली खळे, चामुंडा मामा मंदिराजवळ, चाळीसगाव) व रवींद्र गुलाबराव शिंदे (53, जुना सातारा, कडू प्लॉट, भुसावळ) यांना अटक करण्यात आली.

गुप्त माहीतीवरून कारवाई 
चाळीसगावजवळील ओझर बसस्थानकाजवळ गांजा येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम,महेश जानकर,रवींद्र बागुल, मनोहर देशमुख, रवींद्र पाटील, रामचंद्र बोरसे, महेश पाटील, रामकृष्ण पाटील, इद्रीस पठाण, अशरफ शेख, संजय सपकाळे, दत्तात्रय बडुजर, किरण चौधरी, विनयकुमार देसले, योगेश वराडे आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com