हिमांशू रॉय यांच्या अस्थींचे विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

पंचवटी - राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या अस्थींचे सोमवारी (ता. 14) सकाळी रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले. त्यांच्या पत्नी भावनादेवी रॉय यांच्यासह अन्य नातेवाइक, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह विविध पोलिस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य दहशतवादविरोधी पथकाचे माजी संचालक व अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय (वय 54) यांनी शुक्रवारी (ता. 11) कॅन्सरशी लढताना आलेल्या नैराश्‍यातून खासगी रिव्हॉल्व्हरमधून दुपारी गोळी झाडून आत्महत्या केली होती.
Web Title: himanshu rou Immersion of the bones