सायकलीवर शाळेची वाट शोधणाऱ्या हिरकणीच्या ज्ञानाचा चार जिल्ह्यात झेंडा

yeola
yeola

येवला - अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून शिक्षण घेत ज्ञानाचा दिवा घराघरात तेवत ठेवणारी ज्योत अर्थातच किरण तांबे या विद्यार्थिनीने आपल्या ज्ञानाचा झेंडा चार जिल्ह्यात फडकवला आहे. नागडे या छोट्या गावातून शिक्षणासाठी सतत परिश्रम घेत, ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता सायकलवर दररोज पाच किमीचा प्रवास करीत या हिरकणीने नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार अशा चारही जिल्हयातून सर्वप्रथम येत येवल्याचे नाव रोशन केले आहे.

राज्याच्या शिक्षण संचालनालयातून तीला राज्य माध्य व उच्च माध्यमिक नाशिक विभागीत मंडळात प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाल्याचे पत्र आले आहे. आता तिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, यासाठी अर्ज करण्याचे कळविण्यात आले आहे. मंडळाने तिला कळविण्याची तसदी घेतली नाही पण शिक्षण विभागाला तीन महिन्याने जाग आली अन उशिरा का होईना तिच्या गुणवत्तेची कदर झाली आहे. नाशिक मंडळातील चारही जिल्ह्यातून बारावीच्या कला शाखेतून सर्वाधिक गुण मिळवणारी एकमेव विद्यार्थीनी ठरली आहे.किरण येथील स्वामी मुक्तानंद माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाची विध्यार्थिनी असून मार्च मध्ये झालेल्या परीक्षेत विभागीय मंडळातून कला शाखेतून 91.20 टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आल्याचे पत्र नुकतेच तीला पाठवले आहे.तीच्या या सुयशाबद्दल नुकताच तीचा सत्कार संस्थेचे सचिव दीपक गायकवाड,प्रभारी प्राचार्य चांगदेव खैरे,उपप्राचार्य प्रा.प्रवीण कोकणे,प्रा.एस.बी.देवरे,प्रा.आर.बी.सोनवणे यांनी केला व पेढा भरवून अभिनंदन केले.

‘‘मला दहावीला सर्वाधिक गुण होते.मला सर्वजण विज्ञान शाखेकडे जा असे म्हणत.परंतु,मला कला क्षेत्रातच माझे करिअर करावयाचे असल्यामुळे मी कला शाखा निवडून मेहनत आणि अभ्यास करीत हे यश संपादन केले. माझे पालक,शाळा यांचा यात सिंहाचा वाटा आहे.’’
-किरण तांबे,विध्यार्थिनी

‘‘संस्कृत विषय तीने अकरावी आणि बारावीत ठेवला. संस्कृतातही तीला सर्वाधिक गुण आहेत.याचा तीला प्रथम येण्यासाठी उपयोगच झाला. अतिशय नम्र आणि अभ्यासू,गुणी तथा होतकरू या विद्यार्थीनीचा आम्हांला सार्थ अभिमान आहे.’’
-डॉ.प्रसादशास्त्री कुळकर्णी,संस्कृत अध्यापक

‘‘विद्यार्थीनी सर्वच क्षेत्रात प्रथम येताहेत. किरण तांबे हिने सर्वप्रथम येत धवल यशाची परंपरा कायम राखली.शासनाने तिचा शिक्षणाचा खर्च उचलल्याने आनंद झाला.स्पर्धा परीक्षातून तिने उज्वल करियर करावे.’’
-दीपक गायकवाड,सचिव,श्रीगुरूदेव शिक्षण प्रसारक मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com