
Dhule News : अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची सोमवारी (ता. २२) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्त देशभरात भक्तिमय वातावरण आहे. त्याचे प्रतिबिंब धुळे शहरासह जिल्ह्यात उमटत असून, विविध उपक्रमांतून या धार्मिक सोहळ्याचा कळस रचला जात आहे.
विविध धार्मिक कार्यक्रम आणि उपक्रमातून श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संस्मरणीय करण्यावर भर दिला जात आहे. धुळे शहरात विविध मंदिरांना रंगरंगोटी आणि घरोघरी भगवे ध्वज लावण्यावर भर आहे. (hoisting saffron flags from house to house in dhule for occasion of construction of Shriram temple and idol dedication ceremony in ayodhya news)
त्यात चंद्रशेखर आझादनगर विभागातील माउली प्रतिष्ठानचे संस्थापक विशाल बागूल व चंद्रशेखर आझाद विभाग शिवसेना उपमहानगरप्रमुख हेमंत बागूल, मनोज शिंदे यांच्यातर्फे परिसरातील हमाल प्लॉट, नाटेश्वर कॉलनी, राजेंद्र सुरीनगर, रामचंद्रनगर, नवनाथनगर, शांतीनगर, ५० खोली, अभय कॉलेज कॉलनी परिसर आदी भागात विविध मंडळांना घरोघरी व तसेच धार्मिक संस्थांना भगवे ध्वजवाटप केले जात आहेत.
एकूण अकराशे भगवे ध्वजवाटपाचे उद्दिष्ट आहे. सोमवारी प्रभू श्रीरामांचे प्रतिमापूजन तसेच बुंदी पाकीट वाटपाचा कार्यक्रम चंद्रशेखर आझाद विभागामध्ये होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कर्लेत अक्षतावाटप
कर्ले (ता. शिंदखेडा) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेतर्फे घरोघरी मंगल अक्षतावाटपाचा कार्यक्रम वारकरी संप्रदायाचे नथू गोकुळ पवार यांच्या हस्ते झाला. उपसरपंच गोकुळ बेडसे, साहेबराव पवार, दिनेश ठाकरे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुकाप्रमुख हर्शल पुराणिक, अमित पवार, सचिन सोनवणे, सुमीत चौधरी, हितेश भावसार, नागेश हिरे, हिमांशू पवार, राज माळी, धीरज वाघ, राकेश भोई, प्रवीण चव्हाण, चतुर शिंदे, नथ्यू सोनवणे, सुनील चव्हाण, विलास चव्हाण, देवीदास चव्हाण, भटू वाघ, पिंटू ठाकरे, पप्पू शिंदे आदी उपस्थित होते.
घर सजावट स्पर्धा
लायन्स क्लब आणि श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सोमवारी (ता. २२) घर सजावट स्पर्धा आणि प्रथमच मंदिर आरास सुशोभीकरण स्पर्धा होणार आहे. गुगल लिंकवर हे फोटो अपलोड करून सहभागी होता येईल. प्रथम तीन मंदिरांसाठी बक्षीस देण्यात येईल. ही स्पर्धा धुळे शहरासाठी मर्यादित असेल.
स्पर्धेत रविवारी (ता. २१) मध्यरात्रीपर्यंत नोंदणीतून सहभागी होता येईल. विजेत्यांना सोमवारी सायंकाळी नंदन प्रॉपर्टीज, पंचायत समितीसमोर, वाडीभोकर रोड, देवपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात बक्षीस दिले जाईल.
भाविकांना सहभागाचे आवाहन विशाल केले, धीरज देसर्डा, नितीन बंग यांनी केले. इच्छुकांनी अश्विन दाते (मो. ९८२२३ ०८४९७), श्रीहरी अहिरे (मो. ९५४५६ ४४१४४) यांच्याशी संपर्क साधावा.
प्राणप्रतिष्ठा सोहळा
धुळे शहरात सोमवारी (ता. २२) सकाळी दहाला अनमोलनगरातील श्रीराम मंदिरात श्री शिवलिंग व श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. यानिमित्त शनिवारी शोभायात्रा व कलशयात्रा निघाली. आचार्य अभिषेक जोशी यांच्या हस्ते रविवारी सकाळी आठला होमहवन व पूजनाचा कार्यक्रम होईल. रात्री आठला रामायणाचार्य मच्छिंद्र महाराज यांचे कीर्तन होईल.
सोमवारी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होईल. सकाळी साडेअकराला विवेक महाराज सोनवणे यांचे गोपाळ काल्याचे कीर्तन होईल. तसेच दुपारी साडेबाराला महाआरती होईल. सोमवारी दुपारी एकपासून महाप्रसादाचे वाटप होणार आहे. मंदिराचे संस्थापक तथा संकल्पना (स्व.) गौरव जगताप यांची आहे. भाविकांना उपस्थितीचे आवाहन जय श्रीराम व श्री ब्रह्मचैतन्य महिला चॅरिटेबल ट्रस्टने केले.
गजानन महाराज मंदिर
वाडीभोकर रोड परिसरातील रामनगरातील श्री गजानन महाराज मंदिरात शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली. यात सामुदायिक रामरक्षा, हनुमान चालीसा, गजानन बावनी सामुदायिक पठण, आरती, शनिवारी राम कलश पूजन, सामुदायिक रामरक्षा पठण, आरती झाली. रविवारी सायंकाळी सात ते आठ या वेळेत सामुदायिक रामरक्षा पठण, हनुमान चालीसा पठण, गजानन बावनी, सायंकाळची आरती होईल.
सोमवारी सकाळी सहाला श्रीराम महाअभिषेक, महाआरती होईल. सकाळी आठ ते अकरापर्यंत सुधीर फडके यांनी गायलेले गीतरामायण (ऑडिओ) गायन, सकाळी अकरानंतर दुपारी एकपर्यंत शंखनाद, भजन व अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण दाखविण्यात येईल. मान्यवरांच्या हस्ते आरती व प्रसादवाटप होईल.
भाविकांना सहभागाचे आवाहन श्री सद्गुरू गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गोपाळ केले यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.