Holi Festival : महापालिकेत एकात्मतेची होळी; विविध क्षेत्रांतील महिलांनी घेतला धूलिवंदनाचा आनंद

holi festival celebrated by Officers women in municipal corporation dhule news
holi festival celebrated by Officers women in municipal corporation dhule newsesakal

धुळे : सर्वच क्षेत्रांत महिलांनी (Women) आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. महापालिकेतील सर्वच पदे महिलांकडे आली आहेत. महिलांच्या निर्णयांमुळे शहराचा अपेक्षित विकास होईल. (holi festival celebrated by Officers women in municipal corporation dhule news)

त्यासाठी शहर विकासाचे धोरण ठरविताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत, अशी भावना महापालिकेत पदाधिकारी महिलांनी व्यक्त केली. होळीच्या दिवशी सोमवारी (ता. ६) महापालिकेत महिलांसाठी एकात्मतेची होळी आणि धुलिवंदनाचा कार्यक्रम झाला.

महापालिकेत महापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती, विरोधी पक्षनेते पदाचा कारभार महिलांकडे आहे. यात महापौर प्रतिभा चौधरी यांनी महापालिकेतील महिला पदाधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी होळी तथा धूलिवंदनाचा कार्यक्रम घेतला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

holi festival celebrated by Officers women in municipal corporation dhule news
Nashik News : अंजनेरी प्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित; मित्तल यांचा दणका

तसेच सर्वपक्षीय, संघटना, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेतले. त्यानुसार साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, महापौर चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सारिका अग्रवाल, उपसभापती विमल पाटील, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी, माजी उपमहापौर

कल्याणी अंपळकर, वानूबाई शिरसाट, मोहिनी गौड, रेखा बारी, मंगला मोरे यांच्यासह मनपातील महिला अधिकारी आणि विविध पक्षांच्या नगरसेविका उपस्थित होत्या. एकमेकींना रंग लावत महिलांनी धूलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. गतिशील कामे करून शहर विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा आपण प्रयत्न करू, त्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा महापौर चौधरी यांनी व्यक्त केली.

holi festival celebrated by Officers women in municipal corporation dhule news
Nashik News: 'ओम इग्नोराय नम:' - गौर गोपालदास यांचा विद्यार्थ्यांसाठी खास कानमंत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com