नाशिक - बिबट्याच्या हल्यात शिंगरू ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

खामखेडा (नाशिक) : भादवण (ता. कळवण) तालुक्यातील परिसरात बिबट्याच्या हल्याच्या घटना घडण्याचे प्रकार सरूच असून भादवण गावाच्या गव्हाळी शिवारात गुरवारी पहाटे केलेल्या हल्यात टिपे ता. मालेगाव येथील मेंढपाळाच्या शिंगराचा बिबट्याने फडशा पडला असून मोकाट बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले आहे.

आज (ता.२६) पहाटे भादवन येथील माजी उपसरपंच व्यंकट शंकर जाधव यांच्या गव्हाळी शिवारातील गट न २०७ शेतात कांदा पात चरण्यासाठी आलेल्या मेंढपाच्या कळपातील दोन वर्षाच्या शिंगरावर बिबट्याने केलेल्या हल्यात शिंगराचा मृत्यू झाला आहे.

रात्री दोनच्या  सुमारास  व्यंकट शंकर जाधव यांच्या पिळकोस - बगडू पुलाजवळील गवाळी मळ्यातील शेतात टिपे ता मालेगाव येथील धनराज अण्णा ठोंबरे हा मेंढपाळ तळ ठोकून होते. रात्री २ वाजता बिबट्याने मेंढपाळाच्या कळपातील मोकळ्या असणारऱ्या शिंगरा वर अचानक हल्ला केला.अचानक झालेल्या हल्यानेमेंढ्या बिथरल्याने मेंढपाळ जागे झालेत. मात्र यां मेंढपाळाचेशिंगरू बिबट्याने ओढून नेऊन फस्त केले.बिबट्याच्या धाकाने मेंढपाळानी रात्र जागून काढली. 

या परिसरात बिबट्याच्या वास्तव्याने शेळीपालन करणारे आदिवशी बांधवाना पशुधनाच्या सुरक्षतेसाठी रात्र जागून काढावी लागत आहे. भादवन परिसरातील बिबट्या जेरबंद करणे अत्यंत गरजेचे झाले असून माघील दोन महिन्यात चार जनावरांचा या बिबट्याने फडशा पडला आहे. बिबट्याच्या दहशतीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.वनपरीक्षेत्रपाल शशी वाघ,वनरक्षक डी जि भोये, वन मजूर विवेक पाटील यांनी सकाळी घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी केली.   

नागरिकांनी व  पशुपालाकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे या परिसरात बिबट्याच्या वास्तव्याच्या खुणा व नुकसान दिसत असल्याने परिसरात तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी सुनील जाधव, मोहन जाधव, तुषार जाधव, राहुल जाधव, प्रवीण जाधव, वैभव जाधव, निलेश जाधव यांसह पशुपालक व शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. 

Web Title: horse calf died in leopard attack in nashik