50 फूट विहिरीत पडलेल्या घोड्याला क्रेनच्या मदतीने जीवदान

सायगाव - विहिरीत पडलेल्या घोड्याला बाहेर काढताना युवक.
सायगाव - विहिरीत पडलेल्या घोड्याला बाहेर काढताना युवक.

येवला - दुष्काळाच्या वणव्यात सर्वच भाजून निघत असताना सायगावला एक घोडाच पाण्याच्या शोधात ५० फूट विहिरीत पडला. म्हणतात ना दैव बलवत्तर असेल तर मरणही जवळपास येत नाही. इतक्‍या खोल विहिरीत पडूनही या घोड्याला यत्किंचितही इजा झाली नाही. अखेर येथील युवकांनी क्रेनच्या मदतीने या लाखमोलाच्या घोड्याला बाहेर काढून जीवदान दिले.

सायगाव येथे जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, त्यात जनावरे स्वतः पाण्याचा शोध घेत आहेत. सायगाव फाटा येथे मगन पठारे यांच्या ५० फूट खोल विहिरीत पाण्याचा शोध घेत घोडा पडला असल्याचे आकाश कोथमिरे यांनी पाहिले. घोडा विहिरीत पडला असल्याचे सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल केल्यावर अनेक जण मदतीसाठी सरसावले. विहिरीजवळ पाण्याच्या शोधात गेलेला घोडा विहिरीत डोकावत असताना पाय घसरून पडला असल्याचा अंदाज कोथमिरे यांनी व्यक्त केला. दोन दिवस घोड्याचा शोध घेत कुणीच आले नाही मग अमोल कोथमिरे, हिरामण पठारे, पवन आहेर, मयूर कोथमिरे, योगेश पठारे, रावसाहेब पठारे, सागर पगारे, मिठू बागूल, पोपट पठारे, उमेश पठारे, सोनू पठारे, सचिन आव्हाड, मुस्कान कांबळे या तरुणांना एकत्र घेऊन कोथमिरे यांनी क्रेन बोलावली. अतिशय शिताफीचे प्रयत्न करून क्रेनच्या सहाय्याने घोडा सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात तरुणांना यश आले. घोड्याला बाहेर काढून पाणी पाजून सोडून देण्यात आले. एवढ्या खोल व कोरड्या झालेल्या विहिरीत पडला असतानादेखील घोड्याला मोडतोड कुठेच झाली नाही हे विशेष. या तरुणांचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com