बारावीच्या विद्यार्थिनीची विष घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

जळगाव - बांभोरी बुद्रुक (ता. जळगाव) येथील बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्योती दीपक पाटील (वय 20, रा. बांभोरी बुद्रुक, ता. जळगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील दीपक रामकिसन पाटील शेती करतात. पत्नी रत्नाबाई, मुलगा, मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहात मुलगा दुर्गादासही त्यांना हातभार लावतो. ज्योती हिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. ज्योतीचे वडील दीपक पाटील व भाऊ दुर्गादास दोन्ही गुरुवारी कपाशीची गाडी भरण्यासाठी गेले होते. तर, रत्नाबाई ही स्वामी समर्थ केंद्रात बैठकीला गेली होती. या वेळी घरी एकटी असताना ज्योतीने काहीतरी विषारी औषध प्राशन केले.

Web Title: HSC Girl Student Suicide Poison