vehicle number plate
sakal
धुळे: राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवणे अनिवार्य असताना, जिल्ह्यात या नियमाच्या अंमलबजावणीत उदासीनता दिसून येत आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या तीन लाख पाच हजार ६७७ वाहनांपैकी केवळ ८० हजार ६२० (२६.३७ टक्के) वाहनांनीच ही नंबरप्लेट बसवली असून, उर्वरित दोन लाख २५ हजार ५७ वाहनधारक अजूनही जुन्याच नंबरप्लेटवर धावत आहेत.