Nandurbar : अक्षयतृतियेच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ गजबजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

market during Akshay Tritiya

Nandurbar : अक्षयतृतियेच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ गजबजली

नंदुरबार : अक्षयतृतीयेच्या (Akshay Tritiya) पूर्वसंध्येला येथील बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हातही सोमवारी (ता. २) बाजारपेठ गर्दीने फुलला होता. एसटी (MSRTC) बसेसही सुरू झाल्याने ग्रामीण भागातील जनताही बाजारासाठी आज आल्याचे चित्र होते. आंबे, डांगर, माठ, किराणा बाजारासह विविध वस्तू खरेदीतून लाखोंची उलाढाल झाली.

अक्षयतृतीया हा साडेतीन मुहुर्तापैकीच एक मानला जाणारा शुभमुर्हुत आहे. खानदेशात आखाजीला खुपच महत्त्व आहे. सासरी गेलेली मुलगी माहेरी येऊन आखाजीचा हिंदोळ्यावर उंच झोके घेत तिच्या बालपणीच्या आठवणींना व सासरच्या वागणुकीचे वर्णन करणारे गीते गाते. तसेच शंकर पार्वतीचाही सण म्हणून याकडे पाहिले जाते. त्याचबरोबर वर्षभरात मृत झालेल्या कुटुंबातील व्यक्तींचे मटके भरणे, तसेच अक्षयतृतीयेनिमित्त घरात धन-धान्यासह शांतता व आनंदाचे अक्षय संचित राहो ,म्हणून भरलेली जाणारी घागर व तिचे पूजन केले जाते.वर्षातून येणारा हा सन कौटुंबिकच नव्हे तर माहेरवाशिणीं व तिच्या मैत्रिणींसाठी आनंदपर्वणीच असते.

हेही वाचा: नाशिक : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधनाला पेटंट म्हणून मान्यता

दोन वर्षापासून कोरोनामुळे अक्षयतृतीया घरगुती वातावरणातच साजरी झाली. त्यामुळे यावर्षी अधिकच उत्साह दिसून येत आहे. अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत आंबे,डांगर, किराणा वस्तू खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. लखलखत्या उन्हातही ग्रामीण भागातून खरेदीसाठी गर्दी दिसून आली. दरम्यान, बदाम व केसरी आंबे मोठ्या प्रमाणात विक्री झाले. त्यांचे दर १४० ते १६० रुपये प्रति किलो होते.

हेही वाचा: सिन्नर, पिंपळगाव (बसवंत) मार्गावर CITILINC जलद बससेवा; असे आहे वेळापत्रक

ऑनलाइन हापूसला पसंती
सध्या आंब्यांचा हंगाम (Mango Season) आहे. त्यामुळे हापूस हा आंब्यांचा राजा मानला जातो. त्यातच नैसर्गिक पिकविलेला व देवगड हापूस, रत्नागिरी हापूस असे विक्रेते आपापल्या आंब्याची बढाई करून ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. सोशल मिडियावर (Social Media) ऑनलाइन बुकींगच्या ऑफर्स (Online Booking Offers) दिल्या जात आहेत. साधारण आठशे ते १००० रुपये डझन हापूस आंब्यांचे दर आहेत. बहुतेक नागरिकांनी ऑनलाइन बुकिंग करून हापूस आंबा खास अक्षयतृतीयेचा पुरणपोळी सोबत रसाचा आस्वाद घेण्यासाठी मागविले आहेत.

Web Title: Huge Rush In Market On Occasion Of Akshaya Tritiya Nandurbar News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top