"मी हेल्मेट घालणार' घेतले पाचशे वेळा लिहून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नाशिक - वेळोवेळी हेल्मेट घालण्याबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती करूनही अनेकांकडून या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले. या पार्श्‍वभूमीवर आज शहर वाहतूक विभागाने विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून दंड न स्वीकारता गांधीगिरी स्टाइलने "मी हेल्मेट घालणार' असे पाचशे वेळा लिहून घेतले. या वेगळ्या शिक्षेमुळे वाहनचालकांची हेल्मेट वापराबद्दल जनजागृती झाली आहे. आज शहरातील पंचवटी, म्हसरूळ भागातही पोलिसांनी विनाहेल्मेट वाहनाचालकांविरुद्ध कारवाई करीत दंड वसूल केला.

हेल्मेट सक्तीबाबत शहरात वाहतूक शाखेमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. नवीन नियमांप्रमाणे दंडाची वसुलीही करण्यात येत आहे. मात्र, एवढे असूनही अनेक युवा वाहनाचालकांकडून सर्रास या नियमांचे उल्लंघन करताना आढळून येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज शहरातील पंचवटी, म्हसरूळ, कॅनडा कॉर्नर, गंगापूर रोड आणि शरणपूर रोडवर विनाहेल्मेट दुचाकीचालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत होता. आज दुपारी शरणपूर रोडवरील राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयासमोरही विनाहेल्मेट तरुण दुचाकीस्वारांना पकडले जात होते.

फोन लावूनही सुटका नाही...
कारवाईदरम्यान या वेळी पोलिसांनी दंडाची रक्कम न स्वीकारता त्यांना अद्दल घडावी म्हणून त्यांच्याकडून एका कागदावर पाचशे वेळा "मी हेल्मेट घालणारच' असे लिहून घेतले. या वेळी अनेकांनी सोडवून घेण्यासाठी फोन लावले. मात्र, यातून त्यांची काही सुटका करण्यात आली नाही. पोलिसांच्या या गांधीगिरीमुळे मात्र तरुण वाहनचालकांमध्ये नक्कीच लगाम बसत हेल्मेट वापरण्यासाठी ते पुढाकार घेतील.

Web Title: I had written five times to wear helmets