भावली, वैतरणा, दारणा धरणांच्या पातळीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

इगतपुरी - गेल्या चार दिवसांपासून शहरासह तालुक्‍यात सुरू असलेल्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी भाताच्या लावणीला सुरवात केली आहे. याशिवाय या पावसामुळे भावली, वैतरणा, वाकी-खापरी व दारणा या धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. दुसरीकडे मुकणे धरणाच्या पाणलोट क्षेत्राला आणखी पावसाची प्रतीक्षा आहे.

इगतपुरी तालुक्‍यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे चाकरमाने, विद्यार्थी, पालक, किरकोळ भाजी विक्रेत्यांचे हाल झाले. मुंबई-आग्रा महामार्गाशेजारी असलेल्या अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शहरातील वीजपुरवठाही वारंवार खंडित होत होता.  
आज सर्वाधिक म्हणजे ११० मिलीमीटर पाऊस वैतरणा धारगाव परिसरात झाला. त्या खालोखाल इगतपुरीला ६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरी तालुक्‍यात आत्तापर्यंत ५५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्‍यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने खरिपाच्या, भातलागवडीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्‍यातील जवळपास सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.  घोटी परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे.

इगतपुरी तालुक्‍यातील पाणीसाठा (दलघफूमध्ये) 
दारणा     ६१९ (८.६६ टक्के)
भावली    २४२ (१६.८७ टक्के)
वाकी खापरी    ८२ (३.६० टक्के)
कडवा    ३५ (२.०९ टक्के)

Web Title: igatpuri nashik news bhavali, vaitrana, darana dam water level increase