इगतपुरीत रेव्ह पार्टीवर छापा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

मिस्टिक व्हॅलीमध्ये पुन्हा 16 जणांना अटक
इगतपुरी शहर - येथील मिस्टिक व्हॅली हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत अश्‍लील हावभाव करून नाचणाऱ्या सहा तरुणींसह 16 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यात नाशिक शहरातील एका स्वयंघोषित पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाचा समावेश असल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

मिस्टिक व्हॅलीमध्ये पुन्हा 16 जणांना अटक
इगतपुरी शहर - येथील मिस्टिक व्हॅली हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत अश्‍लील हावभाव करून नाचणाऱ्या सहा तरुणींसह 16 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यात नाशिक शहरातील एका स्वयंघोषित पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाचा समावेश असल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

महामार्गावरील हॉटेल मिस्टिक व्हॅली काही महिन्यांपूर्वी अशाच एका घटनेमुळे प्रकाशझोतात आले आहे. रविवारी रात्री या हॉटेलमध्ये काही युवक-युवती मद्यधुंद अवस्थेत पायाला घुंगरू बांधून अश्‍लील हावभाव करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिक येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलिसांनी रात्री सव्वाबाराच्या सुमारास संयुक्त कारवाई करून तथाकथित पत्रकारासह 16 जणांना अटक केली. संशयितांत नाशिकमधील डॉ. राहुल मगनलाल बागमार (वय 33, रा. रविवार पेठ), अनिल लक्ष्मण बर्गे (वय 42, रा. जुने नाशिक), लक्ष्मण राजेंद्र पवार (वय 31, रा. फुलेनगर), प्रकाश पांडुरंग गवळी (वय 33 रा. आडगाव नाका), अर्जुन दत्तात्रय कवडे (वय 23, रा. मखमलाबाद), बासू मोहन नाईक (वय 44, रा. खडकाळी), आकाश राजेंद्र गायकवाड (वय 19, रा. पाथर्डी फाटा), हर्षद विजयकुमार गोठी (वय 27, रा. पाथर्डी फाटा), चेतन दत्तात्रय कवरे (वय 30, रा. मखमलाबाद रोड), काशी अनंतलाल पंडित (रा. मुंबई), कविता प्रकाश जाधव (वय 30, रा. माझगाव, मुंबई), रसिका राजेंद्र नाईक (वय 31, रा. भांडुप), दिलायला फ्रॅंकी गोजावीस (वय 27, रा. मालाड), नीलम भारती सिंग (वय 31, रा. भाईंदर), आफशा सर्फराज शेख (वय 32, रा. मीरा भाईंदर), तोमा शागो शेख (वय 23, रा. कल्याण) यांचा समावेश आहे. यांना सकाळी जामिनावर सोडण्यात आले.

हॉटेलमालकाची चौकशी
इगतपुरीत रेव्ह पार्ट्यांची संख्या वाढत असल्याने पोलिसांनी मिस्टिक व्हॅलीचे मालक संजय करंबळेकर यांच्यासह सर्वच हॉटेलमालकांची कसून चौकशी सुरू केली आहे. तत्पूर्वी, या घटनेशी संबंधित पत्रकाराने पोलिसांना कायदा शिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, इगतपुरी पोलिसांनी कोणालाही न जुमानता कायदेशीर कारवाई केली.

Web Title: igatpuri nashik news raid on dance party