Latest Marathi News | अवैध, बनावट मद्यनिर्मिती; नाशिकच्या पथकाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Excise Department News

Dhule Crime News : अवैध, बनावट मद्यनिर्मिती; नाशिकच्या पथकाची कारवाई

धुळे : अवैध, बनावट मद्यनिर्मितीसाठी लागणारे अतिशुद्ध मद्यार्काविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आर. आर. धनवटे यांनी दिली.

नाशिक विभागीय पथकाने मंगळवारी (ता. १३) साईढाब्याजवळ मोकळ्या जागेत भारत पेट्रोलपंपाशेजारी, मुंबई-आग्रा महामार्गलगत, सांगवी शिवारात (ता. शिरपूर) छापा टाकून अवैध, बनावट मद्यनिर्मिती करण्यासाठी लागणारे अतिशुद्ध मद्यार्काचा खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल जप्त केला. (Illegal Counterfeit Brewing Against Nashik Squad Take Action Dhule Crime News)

हेही वाचा: Nashik News : सप्तशृंगगडावर 42 कुंडांचे अस्तित्व!; पथकाकडून शोध

या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. अतिशुद्ध मद्यार्क, इतर साहित्य, बॅरल, रबरी नळी, मोबाईल, टीपी व वाहनासंबंधित इतर कागदपत्रे, टँकर (पीबी ०३, बीएच ८३३७) व पिक-अप (एमएच १८, एए ३८५७) जप्त केली.

या मुद्देमालाची किंमत ७८ लाख ३५ हजार ७१० आहे. तसेच संशयित गुन्ह्यात जप्त वाहनांचे मालक तसेच अतिशुद्ध मद्यार्क काढण्यास मदत करणारे इतर संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Dhule Crime News : अवैध गॅसपंपावर धाड; अडीच लाखांचा ऐवज जप्त

भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. पाटील, अ. गो. सराफ, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर यांनी ही कारवाई केली.

जनतेने अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतुकीसंदर्भात कोणतीही माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ तसेच दूरध्वनी क्रमांक ०२५३/२३१९७४४ वर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. धनवटे यांनी केले.

हेही वाचा: Nandurbar News|आरोप प्रत्यारोपांचा परिणाम शिंदे गटावर होणार नाही : पर्णिता पोंक्षे