धुळे: शहरातील साक्री रोड भागातील महिंदळे शिवारात चक्क पांझरा नदीपात्रात गॅबिनय पद्धतीने प्रचंड मोठ्या भिंतीचे बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी भराव टाकून नंतर लेआउट पाडून प्लॉट विक्री करण्याचा हा प्रकार असून, हे बेकायदेशीर काम महापालिका, तहसील कार्यालय, जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही, असा गंभीर आरोप करत याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, काम थांबविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे.